Beed News: पैसे भरूनही वीज कनेक्शन नाही; अंगावर पेट्रोल ओतून संतप्त शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पैसे भरूनही वीज कनेक्शन नाही; अंगावर पेट्रोल ओतून संतप्त शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
Beed News
Beed NewsSaam tv
Published On: 

बीड : कोटेशन भरूनही वीज कनेक्शन न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बीडच्या केज शहरातील उपअभियंता वीज वितरण (MSEDCL) कार्यालयासमोर घडला आहे. यावेळी सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. तर शेतातील वीज पंपाच्या विद्युत जोडणीसाठी वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्याने पैसे मागितल्याच्या आरोपही शेतकऱ्याने (Farmer) केला आहे. (Tajya Batmya)

Beed News
Nandurbar News: दुचाकी उभी करण्याच्या वादातुन चाकू हल्ला

टाकळी (जि. बिड) येथील धनराज सदाशिव घुले (वय 35) असे शेतकऱ्याचे नाव आहे. मागील दोन वर्षापूर्वी वीज जोडणीसाठी कोटेशन भरलेले आहे. परंतु अद्याप त्यांना वीज जोडणी दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. याविषयी त्यांनी वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांना गुत्तेदाराकडे पाठविण्यात आले. गुत्तेदाराने त्यांना 35 हजार रूपयांची मागणी केल्‍याचा आरोप शेतकऱ्यांने केल आहे.

अखेर उचलले पाऊल

या सर्व प्रकाराला कंटाळून संतप्त झालेल्या धनराज घुले यांनी केज येथील उपअभियंता वीज वितरण कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान केज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शेतकरी धनराज घुले यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com