Beed ZP News: उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी माध्यमाचे शिक्षक; शिक्षक समायोजन नवीन घोटाळा समोर

उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी माध्यमाचे शिक्षक; शिक्षक समायोजन नवीन घोटाळा समोर
Beed ZP News
Beed ZP NewsSaam tv
Published On

बीड : बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील उर्दू शिक्षक समायोजनामधील नवा घोटाळा समोर आला आहे. मराठी (Beed News) शिक्षकांना उर्दू शाळेवर नियुक्ती दिल्याने शिक्षकांनाच उर्दू येत नसेल तर विद्यार्थ्यांना शिकवण कसे? असा प्रश्न असतांना या संदर्भात (ZP School) जिल्हा परिषद शिक्षण विभाग मात्र मूग गिळून गप्प आहे. (Tajya Batmya)

Beed ZP News
Beed News: मध्यरात्री उपोषणकर्त्याचे अंथरूण पेटवून जाळण्याचा प्रयत्न?; उपोषणकर्त्याचा गंभीर आरोप

बीड जिल्ह्यात १२ प्रथामिक व माध्यमिक उर्दू शाळांमध्ये अनेक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा पाठपुरावा करूनही भरल्या जात नाहीत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षण विभागाने आता नवा गोंधळ केला आहे. या उर्दू माध्यमांच्या शाळांवर मराठी भाषेच्‍या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मराठी भाषिक शिक्षक उर्दू विद्यार्थ्यांना काय शिकवणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. गेवराई, माजलगाव, पात्रुड, अंबाजोगाई, सायगाव या शाळांवर या नियुक्ती देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मराठी शाळेवर जागा उपलब्ध असतांनाही जवळची शाळा घेण्यासाठी सवलती आणि वेतन काढण्यासाठी उर्दू शाळांवर मराठी माध्यमांच्या शिक्षकांना सर्व नियम डावलून पदस्थापना देण्यात आली आहे.

Beed ZP News
Dhule News: मंत्रालयाबाहेर महिलेची विष प्राशननंतर मृत्‍यूप्रकरणी धुळे पोलिसांत गुन्हा दाखल

पालकांचे खुले आव्‍हान

बीडच्या नेकनूर येथील उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत. मात्र त्या ठिकाणी शिक्षकांची रिक्त पदे असल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे मुख्याध्यापक मोमीन मोहम्मद सिद्दीकी यांनी सांगितलं. शिक्षकांनाच उर्दू भाषा येत नसेल तर विद्यार्थ्यांना काय शिकवणार त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ज्या शिक्षकांना नियुक्ती केली आहे. त्या शिक्षकांनी उर्दूमधील एक पाठ शिकवून दाखवावा, असा खुल आवाहन पालकांनी दिला आहे. तसेच या शिक्षकांचे नियुक्ती करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई केली जावी; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Beed ZP News
Kalyan News: फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक; आमदारांकडून स्टेशन परिसरात पाहणी दौरा

तर शाळांना कुलूप ठोकणार

उर्दू शाळांवर मराठी शिक्षकांना अनधिकृतपणे पदस्थापना देण्यात आली आहे. उर्दू शाळांवर फक्त उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनाच पदस्थापना देण्यात यावी, अशी संघटनेची वारंवार मागणी असूनही जाणूनबुजून असे काम केले जात आहे. या संपूर्ण समायोजन घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. नियमबाह्य नियुक्त्या तात्काळ रद्द करा, अशी मागणी उर्दू शिक्षक संघटना यांनी केली आहे. दरम्‍यान अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या शिक्षण विभागाचा निषेध व्यक्त करतो. ज्या शाळांचा अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना फायदाच होणार नाही, त्या शाळांना कुलूप ठोकण्याचा इशारा एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांनी दिला आहे.

शिक्षणाधिकारी म्‍हणताय माहित नाही..

दरम्यान बीड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना या संदर्भात विचारले असता नेमकं त्यांचा समायोजन आणि नियुक्ती कशी झाली आहे? हे पहाव लागेल. यासंदर्भात मला माहिती नाही, असं म्हणत बाईट देण्यास नकार दिला. मात्र शिक्षण अधिकाऱ्यांनाच समायोजना संदर्भात माहीत नसेल, तर या प्रकरणातील माहिती कशी दडपण्याचा प्रयत्न केला जातोय? याचा प्रत्यय येत आहे. एकंदरीतच या उर्दू शाळेमधील समायोजन घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com