Dhule News
Dhule NewsSaam tv

Dhule News: मंत्रालयाबाहेर महिलेची विष प्राशननंतर मृत्‍यूप्रकरणी धुळे पोलिसांत गुन्हा दाखल

महिलेचा मंत्रालयाबाहेर आत्महत्या प्रकरणी धुळे पोलिसांत गुन्हा दाखल
Published on

धुळे : धुळ्यातील प्लॉट खरेदी फसवणूक प्रकरणी तक्रारदार शीतल रवींद्र गादेकर बारामती (पुणे) येथील महिलेने मुंबई येथे मंत्रालयाबाहेर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान या महिलेचा (Dhule News) उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या प्रकरणी धुळ्यातील मोहाडी पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास मोहाडी पोलीस (Police) करीत आहेत. (Breaking Marathi News)

Dhule News
Eknath Khadse: महाजनांना खडसे नावाचा कावीळ झालाय; आमदार एकनाथ खडसे भडकले

धुळ्यातील एमआयडीसी परिसरात शितल रवींद्र गादेकर या महिलेच्या पतीच्या नावे प्लॉट असून २०१९ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले होते. परंतु २०२० मध्ये त्यांच्याकडून फसवणूक करून बनावट सही करून तसेच काही अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित व्यक्तीने प्लॉट हडपल्याची तक्रार मोहाडी पोलिसात सदर महिलेने या पूर्वी केली होती. मोहाडी पोलिसांनी तपास केला.

Dhule News
Cyber Crime: महिला IPS अधिकाऱ्याच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट; अनेकांना मागितले पैसे

अपेक्षित न्याय मिळाला नसल्याने संबंधित महिलेने न्याय मागण्यासाठी मंत्रालयाच्या बाहेर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात महिलेचा दोन दिवसांपूर्वी उपचारा दरम्यान मुत्यु झाला. या प्रकरणी धुळे पोलिसांनी संबंधितां विरोधात विविध कलमांवये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास मोहाडी पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com