बीड : बीडमध्ये धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा; ही मागणी घेऊन धनगर समाज आक्रमक झाला आहे. या मागणीसाठी (Beed) बीडच्या गेवराई तालुक्यातील खांडवी येथे कल्याण- विशाखापट्टणम महामार्ग आडवत रस्ता रोको करण्यात आला. (Live Marathi News)
मराठा आरक्षणानंतर धनगर समाज आरक्षणासाठी (Dhangar Reservation) आंदोलन करत आहे. दरम्यान २०१४ पूर्वी बारामती येथील आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार आल्यावर आपण धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावू; असा शब्द दिला होता. मात्र तो मार्गी लावला गेला नाही. त्यामुळे आज आमच्या समाज बांधवांना १८ दिवसांपासून चौंडी येथे उपोषण करण्याची वेळ आली.
तर आंदोलन तीव्र
धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला असून महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. तब्बल दोन तास रस्ता रोको केल्याने प्रचंड वाहन कोंडी झाली होती. यामुळं महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू; असा इशारा धनगर समाजाचे नेते परमेश्वर वाघमोडे यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.