Beed News
Beed NewsSaam tv

Patoda Bajar Samiti : पाटोदा बाजार समितीची ८१ गुंठे जमीन परस्पर विक्री; माजी सभापती विरोधात २६ वर्षांनी गुन्हा दाखल

Beed News : लेखा परीक्षणात हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी सहकार विभागाने गुन्हा नोंद करण्याच्या सूचना दिल्या. यावरून लेखापरीक्षक गणेश क्षीरसागर यांना तक्रार देण्यासाठी प्राधिकृत केले होते.
Published on

बीड : बीडच्या पाटोदा बाजार समितीची ८१ गुंठे जमीन त्यावेळचे सभापतींनी पदाचा दुरुपयोग करून पणन महासंचालकांची परवानगी न घेता किंवा संचालक महामंडळाचा ठराव न घेता जमीन नातेवाईकांना विक्री केली. या प्रकरणी माजी सभापती रामकृष्ण बांगर यांच्या विरोधात तब्बल २६ वर्षांनी गुन्हा दाखल झाला आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील पाटोदा बाजार समितीचे तत्कालीन सभापती रामकृष्ण बांगर यांनी १७ ऑगस्ट १९९६ रोजी बाजार समितीची ८१ गुंठे जमीन ८० हजार रुपयांत नातेवाईक किसन कंठाळे यांना विक्री केली. (Bajar Samiti) लेखा परीक्षणात हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी सहकार विभागाने गुन्हा नोंद करण्याच्या सूचना दिल्या. यावरून लेखापरीक्षक गणेश क्षीरसागर यांना तक्रार देण्यासाठी प्राधिकृत केले होते. तक्रारीवरून रामकृष्ण बांगर आणि किसन कंठाळे या दोघां विरोधात सदरील गुन्हा नोंद झाला आहे.

Beed News
Beed News : घरात प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छपाई; पोलिसांची १४ ठिकाणी छापेमारी, एकास अटक

आता याच प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात बांगर यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रामकृष्ण बांगर हे पाटोदा तालुक्यातील राजकारणातील मोठे नाव असून त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत. महानंदा डेअरीचे ते उपाध्यक्ष होते. त्यांचा दूध संघ असून त्यांना परिसरात सहकार महर्षी म्हणून ओळखले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com