Beed News: नियमबाह्य कामास नकार दिल्याने कृषी सहाय्यकावर जीवघेणा हल्ला

नियमबाह्य कामास नकार दिल्याने कृषी सहाय्यकावर जीवघेणा हल्ला
Beed News
Beed NewsSaam tv
Published On: 

बीड : चुकीचे व नियमबाह्य काम करण्यास नकार दिल्याच्या रागातून कृषी सहाय्यकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना (Beed) बीड शहरात उघडकिस आली. सरपंच पती व अन्‍य व्‍यक्‍तींनी मारहाण केली आहे. (Breaking Marathi News)

Beed News
Ratnagiri News: अल्‍पवयीन मुलीवर अत्याचार करत खून, आरोपीला फाशीची शिक्षा

बीड तालुक्‍यातील शुभम प्रकाश हेंद्रे असे गंभीर जखमी झालेल्या कृषी सहाय्यकाचे नाव आहे. ते कुर्ला गावात नोकरीला आहेत. गावातील सरपंच पती आणि इतर चार ते पाच व्यक्तींनी बेदम मारहाण (Crime News) केल्याचा तक्रारीत म्हटले आहे. जीवघेणा हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करा; अशी मागणी कृषी अधिकाऱ्यांनी केली.

Beed News
Nagpur Crime News: चेन स्‍नॅचींगच्‍या तपासात आरोपी अटक; अन्‍य चोरीचे गुन्‍हे झाले उघड

लेखणी बंद आंदोलन

बीड तालुक्यातील कुर्ला गावातील कृषी सहाय्यक शुभम प्रकाश हेंद्रे यांचेवर चुकीचे व नियमबाह्य काम करण्यास नकार दिल्याचे रागातून जीवघेणा हल्ला व बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यात श्री. हेंद्रे गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे सर्व कृषी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, ही मागणी घेऊन लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com