Ratnagiri News: अल्‍पवयीन मुलीवर अत्याचार करत खून, आरोपीला फाशीची शिक्षा

अल्‍पवयीन मुलीवर अत्याचार करत खून, आरोपीला फाशीची शिक्षा
Ratnagiri News
Ratnagiri NewsSaam tv

जितेश कोळी

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून केल्याचे प्रकरण पाच वर्षापूर्वी घडले होते. यातील आरोपीला आज खेड (Khed) येथील जिल्हा सत्र न्यायालयाने (Court) मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. (Tajya Batmya)

Ratnagiri News
Dhule News: राजीनामा मागे घ्या; पवारांच्‍या राजीनाम्‍यानंतर राष्‍ट्रवादीचे आंदोलन

खेड तालुक्यातील सुकिवली गावातील चव्हाणवाडी येथे १९ जुलै २०१८ रोजी १४ वर्षीय मुलीवर बलात्कारा करून तिचा खून करून शौचालयाच्या टाकीमध्ये मृतदेह लपवण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सूर्यकांत नवनाथ चव्हाण या आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला होता. हा आरोपी देखील सुकिवली गावातील होता व मुलीच्या नात्यात होता.

Ratnagiri News
Jalgaon News: घरी एकटा असताना तरूणाने उचलले टोकाचे पाऊल

५ वर्षांनी मिळाला न्याय

या प्रकरणाची सुनावणी खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. आज या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एल. निकम यांनी आरोपी सूर्यकांत चव्हाण याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. खेडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी गावकर्यांनीही सरकारी वकिलांचा सत्कार करून गौरव केला. या प्रकरणात सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद् व सबळ पुरावे तपासून या आरोपीला फाशीची शिक्षा सूनाव्यात आली आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 45 वर्षानंन्तर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com