

Sandeep Kshirsagar Viral Dance Video : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर एका लग्नातील डान्समुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. तर या डान्सचा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांनी तुफान व्हायरल करत पसंती दर्शविली आहे. तर आता पुन्हा एकदा आमदार संदीप क्षीरसागर यांचा हातात निळा झेंडा घेऊन डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
काल गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गीत गायन कार्यक्रमात, निळा झेंडा हाती घेऊन संदीप क्षीरसागरांनी (Sandeep Kshirsagar) अनोखा डान्स केलाय. हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होती.
तर यादरम्यान निळा झेंडा हातात घेऊन संदीप क्षीरसागर गाण्यावर ठेका धरल्याने संदीप क्षीरसागर यांचा जल्लोष नागरिकांना पाहायला मिळाला. दरम्यान गेल्याच आठवड्यात लग्नातील डान्स नंतर संदीप क्षीरसागर यांचा जयंतीतील डान्स व्हायरल झाल्याने, क्षीरसागर चाहत्यांना एकप्रकारे मेजवानीचं मिळाली असून राजकीय वर्तुळात देखील चांगलीचं चर्चा रंगलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.