Family members of the missing minor girl demand justice outside Neknoor Police Station in Beed.
Family members of the missing minor girl demand justice outside Neknoor Police Station in Beed.Saam Tv

दोन महिन्यांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता; न्याय मागायला गेलेल्या कुटुंबालाच पोलिसांची मारहाण, बीड पुन्हा चर्चेत

Beed Minor Girl Missing Police Assault Family: बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांपासून बेपत्ता असून न्याय मागायला गेलेल्या कुटुंबालाच पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.
Published on

योगेश काशीद, साम टीव्ही

बीड: मागील दोन महिन्यांपासून फुस लावून पळविण्यात आलेली मुलगी पोलिसांनी सापडून द्यावी. या मागणीसाठी एक कुटुंब बीड पोलिसांचे उंबरठे झिजवत आहे. मात्र पोलिसांनी पीडित कुटुंबालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात डिसेंबर 2025 रोजी एका तरुणाने अल्पवयीन मुलगी फुस लावून पळवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याचाच पाठपुरावा पीडित कुटुंबाकडून केला जातो आहे. परंतु पोलिसांनी फिर्यादी पीडित कुटुंबाला मारहाण करून गुन्हा नोंदविल्याचा प्रकार समोर आला.

याप्रकरणी पीडित कुटुंबाने न्याय देण्याची मागणी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. घडलेल्या सर्व प्रकाराची रीतसर तक्रार पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे केली. यापूर्वी देखील न्याय मिळत नसल्याने पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली होती. मात्र स्थानिक पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप कुटुंबाचा आहे. दरम्यान आमची मुलगी जिवंत आहे की नाही? किमान एवढं तरी दाखवावं, अशी आर्त हाक मुलीच्या आईची आहे. सर्वसामान्य हे कुटुंब असून मागील दोन महिन्यांपासून न्याय मिळण्याच्या अपेक्षेने पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहे.

मुलीचे नातेवाईक हे पोलीस स्टेशनमध्ये गेले असता पोलिसांनी त्यांनाच मारहाण केली. आम्ही न्याय मागायला गेल्यानंतर मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करावी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी नेकनूर पोलीस स्टेशन मधील घडलेल्या प्रकरणासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांना पाठवून अहवाल मागवला आहे.

अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल. जर मुलीच्या नातेवाईकांना मारहाण झालेली असेल तर धक्कादायक आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासात सत्यसमोर येईल असे नवनीत कावत यांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com