Shahapur Crime: बीडनंतर शहापूर हादरलं! माजी सरपंचावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, काय आहे नेमकं प्रकरण?

Ex-sarpanch Kadam Ughade attack: संतोष देशमुख प्रकरण ताजे असतानाच, अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. काही अज्ञात हल्लेखोरांनी सरपंचावर हल्ला करत चारचाकी फोडलीय.
Attack on car
Ex-sarpanch Kadam Ughade attack: Saam tv
Published On

बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटले. काही जणांना अटक करण्यात आलं असून, मुख्य आरोपी फरार आहे. संतोष देशमुख प्रकरण ताजे असतानाच, शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. काही अज्ञात हल्लेखोरांनी माजी सरपंचावर हल्ला करत चारचाकी गाडी फोडलीय, तसेच बेदम मारहाण केलीय.

बीडचे माजी सरपंच संतोष प्रकरण राज्यभरात चांगलेच तापले. या प्रकरणी सीआयडी, एसआयटी आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र, अशातच अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडे यांच्यावर अज्ञात व्यक्तीनं हल्ला करत त्यांची कारची तोडफोड केलीय. या मारहाणीत माजी सरपंचाचे दोन पायांना मोठी दुखापत झाली असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Attack on car
Beed Crime: धक्कादायक! व्यवसायिक भागिदारांमध्ये पैशाचा वाद, पायाला कुलूप लावून ठेवलं डांबून

अजनुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडा हे आपल्या कामानिमित्त कार घेऊन निघाले. १० वाजताच्या सुमारास त्यांनी घर सोडलं. मात्र, अजनुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायधरा गावाजवळ काही अज्ञात व्यक्तीनं गाडी अडवली. माजी सरपंचाची गाडी अडवत त्यांच्या चारचाकी गाडीवर दगडांचा मारा केला. नंतर अज्ञात व्यक्तीनं माजी सरपंच कदम उघडा यांना गाडी बाहेर काढले.

Attack on car
Beed Crime: बीड बनलंय क्राईम कॅपिटल? आठवड्याला १ खून, २ दिवसाला खूनाचा प्रयत्न अन् अत्याचार

मारेकऱ्यानं माजी सरपंचाला बाहेर काढत मारहाण करायला सुरूवात केली. या मारहाणीत त्यांच्या दोन्ही पायांना जबर मार बसला. त्यांच्या दोन्ही पायांवर मोठी दुखापत झाली. माराहणीनंतर आरोपी फरार झाले. माजी सरपंच यांच्या पायावर जबर मार बसल्यानं त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना कल्याण येथे पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com