Beed Crime: बीडमध्ये रक्षकच बनले भक्षक! मुंबईच्या सराफ व्यापाऱ्याला धमकावत उकाळले ४ लाख

Assistant Police Inspector Extortions: बीडमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याने मुंबईतील एका सराफाला धमकावत त्याच्याकडून ४ लाख रुपये उकळले आहेत. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीमुळे कायद्या सुव्यवस्थेची गंभीर चिंता निर्माण होतेय.
Assistant Police Inspector Extortions:
Beed police officer accused of threatening and extorting ₹4 lakh from a Mumbai jeweller.saam tv
Published On
Summary
  • मुंबई येथील सराफा व्यापाऱ्याकडून उकाळले ४ लाख रुपये

  • पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली.

  • गुन्हेगारी वाढलेल्या बीडमध्ये कायदा सुव्यवस्था नसल्याची बाब उघडकीस आलीय.

गुन्हेगारीमुळे राज्यभरात चर्चेत असणारा बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळीही गुंडगिरीमुळेच बीड चर्चेत आलंय. पण यावेळी कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या गुंडगिरीमुळे बीड चर्चेत आलंय. बीड जिल्ह्यात गुंडांनी धुडघूस घातलाय. खून, दरोडे, चोरी, अपहरणासारखे प्रकार सर्स होत आहेत. आता तर एका पोलीस अधिकाऱ्यानेच व्यापाऱ्याला धमकावत त्याच्याकडे पैसे उकाळल्याची घटना घडलीय.मुंबईतील सराफ व्यापाऱ्याला बीडमधील शिवाजीनगर ठाण्यातील काही पोलिसांनी लुटल्याची घटना घडलीय.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी गजानन क्षीरसागर यांच्यासह इतर पोलिसांनी व्यापाऱ्याला धमकी दिली. त्यांच्याकडून पैसे उकाळले. यासंबंधीची तक्रार आता पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आलीय. पीडित सराफाचे नाव मयंक शांतीलाल जैन आहे. मुंबई येथील सराफा व्यापारी मयंक शांतीलाल जैन हे २४ नोव्हेंबर रोजी बीडला गेले होते. त्यावेळी ते शहरातील विशाल लॉजवर मुक्कामासाठी थांबले होते.

Assistant Police Inspector Extortions:
बायकोच्या बहिणीला लावली फूस; घरातील दागिने, पैसे घेऊन दाजीसोबत मेहुणी पळाली

त्यावेळी अचानक शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रूममध्ये धाड टाकली. त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या मालासह मोबाईल ताब्यात घेतला. फोन स्वीच ऑफ करत मयंक जैन यांना पोलिसांनी धमकावलं. त्यांच्याकडे सात लाख रुपयांची मागणी केली.

Assistant Police Inspector Extortions:
Crime News: मिठीत घेत कपाळाचं चुंबन घेतलं, नंतर गळ्यावर फिरवला चाकू; नववधूला प्रियकरानेच संपवलं

रुममध्ये आलेल्या पोलिसांनी मयंक जैन यांना मेडिकलचे कारण सांगून बीडमधील एका दुसऱ्या व्यापाऱ्याकडून चार लाख रुपये मागवण्यास सांगितले. ही चार लाखांची रुपये रोख रक्कम गजानन क्षीरसागर यांनी घेतली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने इतर तीन लाख रुपये दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजेपर्यंत आणून दे असं धमकावलं.

पोलिसांनी मयंक जैन यांना दुसऱ्या लॉजवर रात्रभर डांबून ठेवलं होतं. त्यानंतर त्यांना सकाळी सोडून दिलं. सुटका झाल्यानंतर मयंक जैन यांनी आपबिती त्यांच्या व्यापारी मित्रांना सांगितली. त्यानंतर या संदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com