

Beed News: महिलेची निर्घृण हत्या (Women Killed) करुन तिचा मृतदेह विहिरीमध्ये फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील विहिरीमध्ये महिलेचा मृतदेह दिसल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. बीडमध्ये (Beed News) ही घटना घडली आहे. या घटनेचा तपास बीड पोलिसांकडून (Beed Police) सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुक्कडगावातील विहिरीमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघड झाली. शेतातील विहिरीमध्ये महिलेचा मृतदेह दिसल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
कुक्कडगाव येथील गणेश आठवले यांच्या शेतातील विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला. अज्ञात व्यक्तीने या महिलेची गळा चिरुन हत्या केली असावी त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीमध्ये फेकला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या महिलेचे वय साधारण 30 ते 32 वर्षांदरम्यान असावे. पिंपळनेर पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. ही महिला कोण आहे?, तिची हत्या कोणी केली असावी? यासर्व बाजूने पोलिस तपास करत आहे.
दरम्यान, बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गुरुवारी मोबाईल चोरीची तक्रार दिल्याच्या रागातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. तरुणाची हत्या करणारे त्याचेच मित्र असल्याचे तपास उघड झाले आहे. हे दोन्ही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.