Santosh Deshmukh Case : देशमुखांच्या खुनानं उलगडले अनेक खून, महादेव मुंडेनंतर सौरभ भौंडवेच्या मृत्यूचंही गूढ; VIDEO

Beed Crime : बीडमध्ये देशमुखांच्या हत्येमुळे आणखी काही खूनांचा उलगडा झालाय. देशमुखांच्या आधीच कोणत्या दोन जणांचा खून करण्यात आला? ही प्रकरणं कशी दाबली गेली? याचंही कराड कनेक्शन कसं उघड झालय? पाहूयात विशेष रिपोर्ट.
Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh CaseSaam Tv
Published On

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडच्या जमिनीत पुरली गेलेली अनेक खुनांची प्रकरणं आता बाहेर येऊ लागली आहेत. परळीतला व्यावसायिक महादेव मुंडेंची परळीत हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. हा आरोप ताजा असतानाच आता आणखी एका मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. बीड शहरातल्या सौरभ भोंडवे या तरूणाचा दीड वर्षापूर्वी संशयास्पद मृत्यू हा खूनच असल्याचा दावा त्याच्या घरच्यांनी केलाय. या तीनही प्रकरणांचा समान धागा आहे तो म्हणजे वाल्मिक कराड कनेक्शन. कुणाचा कधी खून झालाय ते पाहूयात.

महादेव मुंडेंप्रमाणेच आता सौरभ भोंडवेच्या कुटुंबीयांनीही त्याची हत्याच झाल्याचा आरोप केलाय. सौरभचा मित्र गोरख आघाव, संभाजी जायभये, आणि सागर जाधव यांनी खून करून मृतदेह तलावात फेकल्याचं कुटुंबीयांचं म्हणणंय. या प्रकरणातही वाल्मिक कराडनंच पोलिसांवर दबाव टाकल्यामुळे गुन्हा दाखल न झाल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केलाय.

सौरभबाबत नेमकं काय घडलं?

- 13 ऑगस्ट 2024 रोजी सौरभ भोंडवे आपल्या मित्रांसोबत उखंडा तलावाजवळ गेला होता.

- संध्याकाळी 6:14 आईचा शेवटचा कॉल झाला, पण नीट आवाज येत नसल्यामुळे संवाद झाला नाही.

- रात्री 9 वाजता सौरभ हरवला असल्याचा वडिलांना फोन आला.

- सौरभचे मित्र कपडे घेऊन पाटोदा पोलीस ठाण्यात गेले मात्र वडिलांना कॉल केला नाही

- घटनेच्या रात्री शोध घेऊनही मृतदेह सापडला नाही. मात्र दोन दिवसांनी तलावातच सौरभचा मृतदेह सापडला

- 4 दिवसानंतर भोंडवे कुटुंबीयांची तक्रार नोदवण्यास पोलिसांनी नकार दिला.

Santosh Deshmukh Case
Dhananjay Munde : धनंजय मुंडे राजीनामा देणार? दमानियांनी दादांना दिले मुंडे-कराड कंपनीचे पुरावे, पाहा स्पेशल रिपोर्ट

त्यामुळे आणखी एका प्रकरणात गुन्हेगार आणि बीड पोलिसांचं साटंलोटं समोर आलंय. यामुळे मात्र बीड जिल्ह्यातली खुनांची मालिका आणखी किती मोठी आहे आणि बीडच्या जमिनीत आणखी काय काय गूढ दडलंय याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे.

Santosh Deshmukh Case
Walmik Karad : "मी बीड जिल्ह्याचा बाप..." वाल्मीक कराड आणि पोलिसांची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com