Dhananjay Munde : धनंजय मुंडे राजीनामा देणार? दमानियांनी दादांना दिले मुंडे-कराड कंपनीचे पुरावे, पाहा स्पेशल रिपोर्ट

Dhananjay Munde Anjali Damania : अंजली दमानियांनी मुंडे-कराड कंपनीचा नेमका काय कच्चाचिठ्ठा अजितदादांकडे दिला? अजितदादा आता मुंडेंबाबत काय निर्णय घेणार ? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Dhananjay Munde Anjali Damania
Dhananjay Munde Anjali Damania Saam Tv
Published On

Dhananjay Munde Anjali Damania : बीड सरपंच हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मक कराडचे मंत्री धनंजय मुंडेशी थेट संबंध असल्यानं राजीनाम्याची मागणी होतेय, आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी कराड आणि मुंडेंच्या आर्थिक संबंधांची कुंडलीच काढलीय. दमानियांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. या भेटीत त्य़ांनी मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या एकत्र कंपन्यांचे काही कागदपत्र दादांकडे सोपवली आहेत. एवढंच नव्हे तर अजितदादांनी धनंजय मुंडेंवर कारवाई न केल्यास थेट कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिलाय. मात्र याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील असं सांगत धनंजय मुंडेंनी अधिक बोलणं टाळलंय.

अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असा ठाम विश्वास पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केलंय. दमानियांनी कराड-मुंडेंच्या कंपनीचे पुरावेच सादर केले आहे. मुंबई हायकोर्ट आणि पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडेही 40 कागदपत्रे सादर केली आहेत. नेमकं काय आहेत हे पुरावे पाहूयात.

दमानियांचे मुंडेंवर खळबळजनक आरोप

- जगमित्र शुगर्सची 88 एकर 34 गुंठे जमिनीत कराड- मुंडे पार्टनर

- जगमित्र शुगर मिलमध्ये राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक

- व्यंकटेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये राजश्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकत्र

- 2022 मध्ये कंपनीचा नफा 12 कोटी 27 लाख

- कंपनीने 2022 मध्ये अखेरची बॅलन्सशीट भरली

- इंडिया सिमेंट कंपनीची फ्लाय अ‍ॅश च्या वाहतुकीतही कंपनीचा सहभाग

- कराड-मुंडे यांच्यात जमीन एकत्र, कंपनी एकत्र, फ्लाय अ‍ॅश वाहतूक एकत्र असल्याचा दावा

Dhananjay Munde Anjali Damania
Walmik Karad : "मी बीड जिल्ह्याचा बाप..." वाल्मीक कराड आणि पोलिसांची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल

दमानियांनी थेट कागदपत्रंच जाहीर केल्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढलाय एवढं नक्की. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना पाठीशी घालणार की त्यांचा राजीनामा घेऊन स्वच्छ कारभाराची ग्वाही देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Dhananjay Munde Anjali Damania
Atal Setu Toll Tax : दिलासादायक! अटल सेतूवर वर्षभर टोलवाढ नाहीच, वाहनचालकांना किती टोल भरावा लागणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com