Beed Breaking: मोठी बातमी! माजी मंत्र्यांच्या पीएवर कोयत्याने हल्ला, बीडमध्ये दहशतीचं वातावरण

Attack On Former Minister Suresh Navale PA Lalit Abbad: बीडमधून एक मोठी बातमी समोर आलीय. माजी मंत्री सुरेश नवले यांच्या पिएवर कोयत्याने हल्ला झालाय.
माजी मंत्री सुरेश नवले
Former Minister Suresh Navale Saam Tv
Published On

विनोद जिरे, साम टीव्ही बीड

बीडमध्ये माजी मंत्री सुरेश नवले यांच्या पिएवर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडलेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. या हल्ल्यात माजी मंत्री सुरेश नवले यांचे पिए गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री सुरेश नवले यांचे पीए ललित अब्बड हे त्यांच्या घरासमोर थांबलेले होते. तेव्हा दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. घरासमोर थांबलेले असताना ललित अब्बड यांच्यावर दोघाजणांनी कोयत्याने वार (Beed Crime News) केले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. पीए ललित अब्बड यांना तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं (Attack On Former Minister Suresh Navale PA) होतं.

फरार आरोपींचा शोध सुरू

याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आलाय. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. हल्लेखोर कोण होते? नेमका हा हल्ला कशामुळे झाला? याचं कारण अजून समजू शकलेलं नाही. घरासमोर उभं असताना दोघेजण दुचाकीवरून (Crime News)आले. त्यांनी माझ्यावर कोयत्याने हल्ला केला, अशी माहिती माजी मंत्री सुरेश नवले यांचे पीए ललित अब्बड यांनी पोलिसांना दिलीय.

माजी मंत्री सुरेश नवले
Terrorist Attack : भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट; गुजरातमध्ये लपवली शस्त्रे, ATS तपासात धक्कादायक माहिती उघड

कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

मंत्र्यांच्या पीएवरच हल्ला झाल्यामुळे सध्या बीडमध्ये मोठं दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचं (Beed News) समजतंय. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. ही धक्कादायक घटना बुधवारी १७ जुलै रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळातेय. हल्लेखोरांना पकडल्यानंतरच या हल्ल्यामागील कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

माजी मंत्री सुरेश नवले
Donald Trup Rally Attack: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, PM मोदींवरही रॅलीदरम्यान झाला होता हल्ला; भाजप नेत्यांनी केली आठवण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com