पैसे काढले, मोबाईल हिसकावला, चौघांनी घेरुन अल्पवयीन मुलाला बेदम मारलं; बीडचा आणखी एक Video व्हायरल

Beed Ambajogai Minor Boy beaten Video : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतील पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. अल्पवयीन मुलाला तिघा चौघांनी घेरून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Beed Ambajogai minor boy brutally beaten
Beed Ambajogai minor boy brutally beatenSaam Tv News
Published On

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर नवनवीन मारहाणीचे व्हिडिओ समोर येत आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्या, त्यानंतर धनंजय देशमुख यांच्या साडूने एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. बीडमध्ये मारहाण करताना व्हिडिओ काढणे जणू हा पॅटर्नच बनला आहे. एवढं असताना देखील जिल्ह्यातील अंबाजोगाईतील पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलाला तिघा चौघांनी घेरून त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

त्याचे पैसे घेतले, मोबाईल हिसकावला गेला. गुन्हा घेण्यास पोलिसांनी विलंब केला हे दुर्दैव आहे. ऍट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा का नोंद केला नाही? बीड पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घ्यावी. सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश द्यावेत. आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करावे. तात्काळ आरोपींना अटक करून कायद्याचा जबर धाक दाखवला पाहिजे.

Beed Ambajogai minor boy brutally beaten
CM Fadnavis: मंत्री आहात राजधर्म पाळा, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा नितेश राणेंचे टोचले कान

व्हिडीओ काढून बीड जिल्ह्यात मारण्याचे प्रकार वाढले आहेत त्या अनुषंगाने कुणी जाणीवपूर्वक हे करतंय का? यामागे पोलिसांना, पोलीस अधीक्षकांना बदनाम करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा निर्माण करण्यासाठी हे कृत्य करतंय का याची सखोल चौकशी करावी. राज्य सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सपशेल फेल झालेले आहेत. त्यांच्या कारकिर्दीला चॅलेंज देणाऱ्यांना ते रोखू शकलेले नाहीत. त्यामुळे दलितांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेना जाहीर निषेध करत असून तात्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी करत आहे, असं ऑल इंडिया पँथर सेनेचे दिपक केदार यांनी म्हटलं आहे.

Beed Ambajogai minor boy brutally beaten
Disha Salian : माझी लेक आत्महत्या करुच शकत नाही, आमची दिशाभूल करण्यात आली; दिशा सालियानचे वडील काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com