CM Fadnavis: मंत्री आहात राजधर्म पाळा, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा नितेश राणेंचे टोचले कान

CM Fadnavis: एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नितेश राणेंचे कान टोचले आहेत.
Nitesh Rane
Nitesh Rane Saam Tv
Published On

वादग्रस्त विधान करण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पुन्हा एकदा नितेश राणे यांचे कान टोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मंत्री नितेश राणे यांच्याकडून वादग्रस्त विधाने केली जात आहेत. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी त्यांना एकदा तंबी दिली. आता एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राणेंचे नाव न घेता त्यांना सुचक सल्ला दिलाय.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर २०२५ पुरस्कार सोहळा मुंबईतील राजभवनात पार पडला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना नितेश राणे यांच्या नावाचा उल्लेख न करता एक प्रश्न करण्यात आला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका विधानाचा उल्लेख करत नितेश राणेंचे कान टोचले. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना मंत्र्याकडून धार्मिक तेढ वाढवणाऱ्या विधानांबद्दलचा प्रश्न केला.

काय होता प्रश्न ?

सरकारमधील काही जबाबदार व्यक्ती काही विशिष्ट समाजाच्या बाबतीत अत्यंत टोकाची भाषा वापरतात. त्यामुळे समजात तेढ निर्माण,असं चित्र निर्माण व्हायला लागलंय. यावर तुमची भूमिका काय असा सवाल जयंत पाटील यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, जेव्हा आपण मंत्री असतो, तेव्हा संयमानेच बोललं पाहिजे. मंत्री म्हणून आपली एक भूमिका आहे. त्याचा उल्लेख अटलबिहारी वाजपेयींनी केला होता, मंत्री म्हणून आपल्याला राजधर्म पाळायचा असतो." असं उत्तर देत त्यांनी राणेंनी समज दिलीय.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आपले विचार काय आहेत? आपली आवड, नावड काय आहे, हे बाजूला ठेवून. आपण संविधानाची शपथ घेतलीय. संविधानाने आपल्याला कुणासोबत अन्याय न करता वागण्याची जबाबदारी आपल्यावर दिली आहे. तरुण मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे. आपल्या बोलण्यातून कुठेही तेढ निर्माण होणार नाही. याचा प्रयत्न केला पाहिजे. कधी-कधी तरुण मंत्री बोलून जातात. मी त्यांच्याशी संवाद करतो. तुम्ही मंत्री आहात, त्यामळे संयम बाळगून बोललं पाहिजे, असं आपण स्वत: त्यांना बोलत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com