Disha Salian : माझी लेक आत्महत्या करुच शकत नाही, आमची दिशाभूल करण्यात आली; दिशा सालियानचे वडील काय म्हणाले?

Disha Salian Latest Breaking News : माझ्या लेकीची हत्याच झाली आहे. ती आत्महत्या करु शकत नाही, असा दावा दिशाच्या वडिलांनी केला. माझ्या लेकीच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या.
Disha Salian father Satish Salian serious allegations
Disha Salian father Satish Salian serious allegationsSaam TV News
Published On

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. दिशाच्या आई-वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत याचिका दाखल करत दिशाच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केलीय. आमची लेक आत्महत्या करुच शकत नाही. तिची हत्याच झाली आहे आणि त्या हत्येचा संबंध सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी आहे, असा खळबळजनक दावा दिशाच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा आमदार आदित्या ठाकरेच्या चौकशीची मागणी देखील दिशाच्या आई, वडिलांनी याचिकेतून केली आहे.

८ जून २०२० रोजी दिशाचा मुंबईतील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. दिशा सालियानची सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणेंनी केला होता. त्यावेळी दिशाच्या कुटुंबियांनी तो आरोप फेटालळा होता. आमच्या लेकीची बदनामी थांबवा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र, आता दिशाच्या आई-वडिलांनी दिशाची हत्या झाली असल्याचा दावा केला आहे. त्यांनी आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Disha Salian father Satish Salian serious allegations
Disha Salian Death Case: दिशा सालियन प्रकरणाला धक्कादायक वळण, सामूहिक बलात्कार करुन हत्या; वडिलांचा आरोप

माझ्या लेकीची हत्याच झाली आहे. ती आत्महत्या करु शकत नाही, असा दावा दिशाच्या वडिलांनी केला. माझ्या लेकीच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. ती १४ व्या मजल्यावरुन पडली असती, तर शरीरावर कुठेतरी जखमा झाल्या असत्या. पण चेहऱ्यावर, डोक्याला कुठेही इजा झालेली नव्हती, असं दिशाचे वडील सतीश सालियान यांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना सांगितलं.

दिशावर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आमची दिशाभूल केली. पेडणेकर यांनी आम्हाला नजरकैदेत ठेवलं. पुरावे खरे मानण्यास भाग पाडलं, असे गंभीर आरोप दिशाच्या वडिलांनी केले आहेत. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवरही दिशाच्या वडिलांनी खळबळजनक आरोप केले आहेत. नितेश राणेंच्या आरोपात तथ्य असल्याचंही दिशाच्या वडिलांनी याचिकेत नमूद केलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

Disha Salian father Satish Salian serious allegations
Disha Salian : दिशा सालियन प्रकरणात किशोरी पेडणेकरांचा दबाव; गंभीर आरोपावर पेडणेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com