Jalna Crime News: हॅलो, मी करिष्मा पाटील बोलतेय...बँक कर्मचारी महिलेने केली १ लाख 56 हजारांची फसवणूक

Jalna Crime News: एका महिलेने पोलीस कर्मचाऱ्याला विश्वासात घेऊन त्यांच्याकडून क्रेडीट कार्ड, बँक डिटेल्स व ओटीपीची माहिती घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे
Jalna Crime News/representative image
Jalna Crime News/representative imageSaam tv
Published On

Jalna News: हॅलो, मी करिष्मा पाटील बोलतेय म्हणत जालन्यातील एका महिलेने पोलीस कर्मचाऱ्याला विश्वासात घेऊन त्यांच्याकडून क्रेडीट कार्ड, बँक डिटेल्स व ओटीपीची माहिती घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेने तब्बल 1लाख 56 हजार 108 रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना जालन्यात घडली आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

जालन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या राम शंकरराव पारवे या कर्मचाऱ्याला हॅलो, मी करिष्मा पाटील बोलतेय, असं म्हणत बँकेची अधिकारी असल्याचं भासवत चक्क या महिलेने कॉलवरून क्रेडीट कार्ड, बँक डिटेल्स व ओटीपीची माहिती घेऊन फ्लिपकार्टच्या माध्यमातून आयफोन मोबाईल खरेदी केला आहे.

Jalna Crime News/representative image
Kolkata Crime News: गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमधील कडाक्याच्या भांडणात मुलीच्या कुटुंबीयांची एन्ट्री; तरुणाला बेदम मारहाण करत कापले ओठ

पारवे यांना ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली. यानंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे फिर्यादींची ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम आरोपींनी फ्लिपकार्टद्वारे आयफोन मोबाईल खरेदी करण्यासाठी वापरली असल्याचे शोधून काढले.

यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपी आरोपी महिला करिष्मा देवराव सोनवणे हिला औरंगाबाद व अमोल कडूबाप्पू वारकर याला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. या गुन्हात वापरलेल्या ५ मोबाईल रोख रक्कमेसह एकूण 1 लाख 91हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या आरोपींच्या विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

Jalna Crime News/representative image
Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत 'स्पेशल २६' चा थरार; 6 जण वाऱ्यासारखे आले अन् तत्कालीन अधिकाऱ्याचं घर साफ करून गेले

विशेष म्हणजे यातील महिला आरोपी करिश्मा देवराव सोनवणे ही एका राष्ट्रीय बँकेतील गारखेडा शाखा,औरंगाबाद या ठिकाणी कर्मचारी असल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने पोलिस या प्रकारणी अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com