Maratha Reservation: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखणाऱ्यांना मराठा कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

Maratha Reservation : महामार्ग रोखणाऱ्या मराठा आंदोलकांना न्यायालयाने जामीन मंजूर केलाय.
solapur Maratha reservation
solapur Maratha reservation saam Tv
Published On

Maratha Reservation :

सोलापुरातील सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखणाऱ्या मराठा आंदोलकांना न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. प्रत्येकी साडेसात हजाराच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने कार्यकर्त्यांना मंजूर केला. बुधवारी दुपारी मराठा आंदोलकांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळत पाऊण तास महामार्ग रोखला होता. याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाच्या १२ कार्यकर्त्याना अटक करण्यात आली होती. (Latest News)

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या सोलापुरातील आंदोलकांना अटक करण्यात आली होती. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलं. जरांगे-पाटील यांनी सरकारला वेळ देण्याचं मान्य केलं. दरम्यान आरक्षणासाठी सरकारकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करत मराठा समाज आक्रमक झाला होता.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यातील अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी आंदोलन केलं. तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. राज्यातील अनेक जिल्ह्यात उग्र आंदोलन झालं. याचदरम्यान टायर जाळत महामार्ग रोखण्यात आली होती. आरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सकल मराठा समाज आक्रमक होत त्यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग सुमारे एक तास रोखून धरला होता.

चिखली, पोखरापूर, लांबोटी या ठिकाणी ही रास्ता रोको केला होता. जिल्हा समन्वयक माऊली पवार यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे यांचा आदेश आणल्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको स्थगित केला होता. दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मराठा आंदोलनाचे लोन ग्रामीण भागात पोहोचलं होतं. चिखली फाटा, पोखरापूर लांबोटी, खवणी फाटा या ठिकाणीही रास्ता रोको करण्यात आला होता.

दोन ठिकाणी एसटी बसच्या काचा फोडल्या

सोमवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या दरम्यान मोहोळ ते मसले चौधरी जाणारी एम एच १४ बीटी ३४२७ क्रमांकाची बस मसले येथे येताच ४० ते ५० जणांच्या समूहाने थांबविली. चालकाला दमदाटी करून त्याला खाली उतरविले त्यानंतर या गटाने बसच्या काचा फोडल्या. या प्रकरणी चालक नारायण तुकाराम रणदिवे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली.

सोमवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या दरम्यान मोहोळ ते मसले चौधरी जाणारी एम एच १४ बीटी ३४२७ क्रमांकाची बस मसले येथे येताच ४० ते ५० जणांच्या समूहाने थांबविली. चालकाला दमदाटी करून त्याला खाली उतरविले त्यानंतर या गटाने बसच्या काचा फोडल्या. या प्रकरणी चालक नारायण तुकाराम रणदिवे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली.

solapur Maratha reservation
Manoj jarange Patil: सरकारला सळो-पळो करणाऱ्या जरांगे-पाटलांनी कोणत्या मुद्द्यावरून उपोषण घेतलं मागे; वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com