'शिवराय लढून थकले, रामदासांकडे राजपाट दिला, बागेश्वर बाबानं तोडले अकलेचे तारे

Bageshwar Baba Controversy On Shivaji Maharaj: बागेश्वर बाबानं छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केलयं...नवा जावई शोध लावत बागेश्वर बाबा शिवरायांबद्दल नेमकं काय म्हणाले...महाराजांचा अवमान केल्यामुळे महाराष्ट्रात कसा वाद पेटलाय..
Dhirendra Shastri alias Bageshwar Baba faces backlash after controversial remarks on Chhatrapati Shivaji Maharaj during a Nagpur event.
Dhirendra Shastri alias Bageshwar Baba faces backlash after controversial remarks on Chhatrapati Shivaji Maharaj during a Nagpur event.saam tv
Published On

ऐकलतं.. दिव्य दरबारात लोकांच्या मनातले विचार कागदावर लिहून न सांगता समस्य़ा सोडवणारे हे आहेत... धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा...स्वत:वर हनुमानाची कृपा असल्याचं सांगून अनेक ठिकाणी दिव्य दरबार भरवणाऱ्या याचं बागेश्वर बाबानं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केलं... ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलयं... बागेश्वर बाबा नेमकं काय म्हणाले तुम्हीच ऐका...

विशेष म्हणजे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. या वादग्रस्त विधानानंतर मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसने केलीय... तर बागेश्वर बाबांवर महाराष्ट्रात बंदी घाला अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलीय..तर इतिहास अभ्याकांनी बागेश्वर बाबांच्या विधानाला भाकडकथा म्हटलं आहे.

दुसरीकडे बागेश्वर बाबांच्या विधानामुळे वाद पेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही इतिहासात असा कुठलाच उल्लेख नसल्याचं म्हटलंय

राज्यात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून चांगलाच वाद पेटलाय..एकीकडे इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांवर बंदीची आणि प्रकाशकाला मारहाणीची धमकी दिली जातेय..तर दुसरीकडे बुवा बाबांकडून इतिहासाचं विकृतीकरण केलं जातयं...हे दिवास्वप्न बागेश्वर बाबाला कोणत्या दिव्य दरबारात दिसलं..?त्यामुळे महाराष्ट्राच्या भूमीत येऊन शिवरायांचा अवमान करणाऱ्या, प्रचारकी इतिहास सांगणाऱ्या या बागेश्वर बाबाला कोण रोखणार? सवंग प्रसिद्धीसाठी शिवाजी महाराज किंवा इतर महापुरूषांबाबत बिनबुडाची वक्तव्य करणाऱ्या या बाबांना अद्दल घडवायलाच हवी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com