Maharashtra Cold Wave : राज्यात थंडीची लाट..बदलापूरात मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद

Badlapur News : वर्षाखेरीस डिसेंबर महिन्यातच थंडीचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतंय. पुढील तीन ते चार दिवस थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. बदलापुरात आज पहाटे ९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Maharashtra Cold Wave
Maharashtra Cold WaveSaam tv
Published On

मयुरेश कडव
बदलापूर
: गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढला आहे. उत्तर भारतात गारठलेल्या वातावरणाचा परिणाम जाणवत असून राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातील बदलापुरमध्ये मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. यासोबत धुळे, लातूर, जळगाव जिल्ह्यात देखील थंडीचा जोर अधिक वाढला आहे. 

उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्याने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात गारठा वाढला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर अधिक असून येथील तापमान ५ अंशाच्या खाली गेले आहे. तर बदलापुरात आज पहाटे ९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी पारा १० अंशावर घसरला होता. मुंबईत १४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. वर्षाखेरीस डिसेंबर महिन्यातच थंडीचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतंय. पुढील तीन ते चार दिवस थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Maharashtra Cold Wave
Onion Price : नगर बाजारात कांद्याची विक्रमी आवक; ८०० रुपयांनी भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत

लातूर जिल्ह्यात तापमानाचा पारा ६ अंशावर
लातूर
: मागच्या काही दिवसापासून लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही तापमानाचा पारा घसरला आहे. निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनी या परिसरात ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सध्या ग्रामीण भागात थंडीची लाट वाढल्याने वयोवृद्ध व्यक्तींना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटी पेटवून आधार घेत आहेत. 

Maharashtra Cold Wave
Kalyan Mahavitaran : कल्याण पूर्वेत अघोषित लोडशेडिंग; महावितरण अधिकाऱ्यांना माजी नगरसेवकाकडून कंदील भेट देत निषेध

धुळ्यात पारा ४ अंशावर स्थिरावला 

उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव व नाशिक जिल्ह्यात देखील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात धुळे जिल्ह्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली असून मागील तीन- चार दिवसांपासून तापमान ४ अंश सेल्सिअसवर स्थिरावला आहे. तर पुढील काही दिवस अशा प्रकारचीच थंडीची लाट राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com