Onion Price : नगर बाजारात कांद्याची विक्रमी आवक; ८०० रुपयांनी भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत

Ahilyanagar News : सध्या लाल कांद्याची काढणी करण्यास सुरवात झाली आहे. गेल्या दोन- तीन लिलावांत लाल कांद्याला चांगले भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला होता.
Onion Price
Onion PriceSaam tv
Published On

सुशील थोरात 

अहिल्यानगर : अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक सुरु झाली आहे. नेप्ती उपबाजारात १ लाख ५६ हजार कांदा गोण्याची आवक झाली आहे. कांद्याची अचानक आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव गडगडले असून मागील काही दिवसांपासून पाच हजाांपर्यंत गेलेला भाव प्रति क्विंटल ८०० रुपयांनी घसरला आहे. 

सध्या लाल कांद्याची काढणी करण्यास सुरवात झाली आहे. गेल्या दोन- तीन लिलावांत लाल कांद्याला चांगले भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीला आणला होता. दरम्यान नेप्ती उपबाजारात १ लाख ५६ हजार ८७६ इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा गोण्यांची आवक झाली. क्विंटलमध्ये हि आवक ८६ हजार २८१ इतकी होती. उपबाजारात हि आवक अजूनही सुरूच आहे. 

Onion Price
Sambhajinagar Crime : अकरा महिन्यांत संसाराची राखरांगोळी; चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

८०० रुपयांनी भाव घसरले 

याठिकाणी दाखल झालेल्या उच्च प्रतीच्या लाल कांद्याला ३ हजार ३०० इतका भाव मिळाला. अशा ४१ कांदा गोण्या होत्या. तर लिलावात उच्च प्रतीच्या कांद्याला ४ हजार १०० इतका भाव होता. सोमवारी एक नंबरच्या लाल कांद्याला २ हजार ३०० ते ३ हजार इतका भाव
मिळाला. तर शनिवारी याच कांद्याला ३ हजार ते ३ हजार ८०० इतका भाव होता. सोमवारी तोच भाव प्रति क्विंटल ८०० रुपयांनी घसरला. लाल कांद्याचे भाव सरासरी ३०० ते ३ हजार इतके झाले होते. 

Onion Price
Sugar Factory : राज्यातील कारखान्यांचा साखर उतारा चिंताजनक; ऊस मिळवण्यासाठी साखर कारखान्यांची धडपड

आवक वाढल्याने दरात घसरण 

शनिवारच्या लिलावात हेच सरासरी भाव ३ हजार ४०० ते ३ हजार ८०० इतके होते. एकदम आवक वाढल्यानेच कांद्याचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत काहीसे कमी झाले. आजचे कांद्याचे भाव एक नंबर कांदा २ हजार ३०० ते ३ हजार रुपये आहे. तर दोन नंबर कांदा १ हजार ५०० ते २ हजार ३००, तीन नंबर कांदा ९०० ते १५०० तर चार नंबर कांदा ३०० ते ९०० रुपये दरांवर आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com