Kalyan Mahavitaran : कल्याण पूर्वेत अघोषित लोडशेडिंग; महावितरण अधिकाऱ्यांना माजी नगरसेवकाकडून कंदील भेट देत निषेध

Kalyan News : परीक्षा काळात विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून देखील अधिकारी, कर्मचारी जुमानत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
Kalyan Mahavitaran
Kalyan MahavitaranSaam tv
Published On

अभिजीत देशमुख
कल्याण
: महावितरणकडून अघोषित भारनियमन केले जात असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असते. अशाच प्रकारे महावितरणचा गलथान कारभार कल्याण पूर्वेत पाहण्यस मिळत असून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने कल्याण पूर्वेत महिलां, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अधिकारी देखील उडवाडवीचे उत्तर देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 

कल्याण पूर्वेत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झालेत. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने परीक्षा काळात विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून देखील अधिकारी, कर्मचारी जुमानत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. 

Kalyan Mahavitaran
Sugar Factory : राज्यातील कारखान्यांचा साखर उतारा चिंताजनक; ऊस मिळवण्यासाठी साखर कारखान्यांची धडपड

कंदील भेट देत नोंदविला निषेध 

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या या समस्येच्या प्रकरणी आज कल्याण पूर्व येथील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी काही नागरिकांसोबत वीज वितरण कार्यालयाला धडक दिली. यावेळी वीज पुरवठा खंडित कोणत्या कारणामुळे होत आहे. याबाबत जाब विचारला. तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता चंद्रमणी मिश्रा यांना कंदील भेट देत महावितरणच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदवला. 

Kalyan Mahavitaran
Onion Price : नगर बाजारात कांद्याची विक्रमी आवक; ८०० रुपयांनी भाव घसरल्याने शेतकरी अडचणीत

तीव्र आंदोलनाचा दिला इशारा 

दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तसेच रस्त्यांवरील वाहतूक कोंडी अडथळे ठरणारे पोल बदलून त्याऐवजी मोनो पोल बसवा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. तर येत्या पंधरा दिवसात वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या सुटली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा महेश गायकवाड यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com