Shantabai Kale : साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट! लोककलावंत शांताबाई काळेंना मिळणार घर

Prahar Of Bacchu Kadu : लोककलावंत शांताबाई काळे यांच्यावर 'कोणी घर देत का घर' असं म्हणण्याची वेळ आली होती.
Shantabai Kale
Shantabai Kalesaam tv
Published On: 

Solapur News : 'कोल्हट्याच पोर' या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या आई आणि लोककलावंत शांताबाई काळे यांच्यावर 'कोणी घर देत का घर' असं म्हणण्याची वेळ आली होती. साम टीव्हीने हा विषय लावून धरल्यानंतर आता माजी मंत्री बच्चू कडू यांची 'प्रहार' संघटना शांताबाईंच्या मदतीला धावून आली आहे.

प्रहारने शांताबाईंना घर बांधून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील नेरल्यात तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी घरासाठी जागा मिळवून दिली होती. परंतु दरम्यानच्या काळात त्यांची बदली झाली आणि हा विषय मागे पडला.

Shantabai Kale
Nashik News: पुरोगामी महाराष्ट्र हादरला; पतीच्या दशक्रियेला गेल्यानं विधवा पत्नीचं तोंड काळं केलं, गावात काढली धिंड

एकेकाळी महाराष्ट्रभर नावाजलेल्या लोककलावंत शांताबाई काळे यांच्यावर भाड्याच्या घरात कसेबसे दिवस काढण्याची वेळ आली होती. शांताबाई काळे यांच्या घरासाठई आता बच्चु कडू यांच्या प्रहारने पुढाकार घेतला असून जोपर्यंत शांताबाईंच पक्क घर तयार होत नाही तोपर्यंत त्या राहत असलेल्या घराचं भाडं आणि उदरनिर्वाहाची जबाबदारी प्रहार जनशक्ती पक्षाने घेतली आहे.

Shantabai Kale
Nandurbar Accident : नंदूरबारमध्ये भीषण अपघात; गरोदर मातांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटली

शांताबाई काळे यांच्यासाठी लवकरात लवकर दोन पक्क्या खोल्या बांधून देण्याची जबाबदारीही प्रहार जनशक्ती पक्षाने घेतली आहे. त्यामुळे शांताबाईंच्या घराची प्रतीक्षा सध्या लवकरच संपणार आहे.

Edited By - Chandrakant Jagtap

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com