Bacchu Kadu Prahar : शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या बच्चू कडूंच्या 'प्रहार' संघटनेची कोंडी; अकोला जिल्हाध्यक्षावर ज्वारी खरेदीत भ्रष्टाचार

Prahar Shetkari Sanghtana : अकोट येथील ज्वारी खरेदी घोटाळ्यात प्रहार पक्षाच्या अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांचं नाव आल्याने पक्ष अडचणीत सापडला आहे. आमदार अमोल मिटकरींच्या मागणीवरून एसआयटी चौकशी जाहीर करण्यात आली आहे.
bacchu kadu News
bacchu kadu Saam tv
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रहारचे नेते बच्चू कडूंच्या उपोषण आणि पदयात्रेने महाराष्ट्र ढवळून निघालाय. मात्र, बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु यांच्यामूळे पक्ष अडचणीत आला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीच्या ज्वारी खरेदीत वसु यांच्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने शेतकऱ्यांच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी विधान परिषदेत या घोटाळ्यावर लक्ष वेधलं आहे. त्यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एकीकडे पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी सरकारला धारेवर धरत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यावर फसवणूक केल्याचा आरोप होत असल्याने बच्चू कडू यांच्या पक्षाची कोंडी झाली आहे.

bacchu kadu News
Bacchu Kadu: अहमदाबादच्या घटनेनेनंतर बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावं; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली विनंती|VIDEO

अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समिती राज्यभर चर्चेत आली ती ज्वारी खरेदी घोटाळ्याच्या आरोपामुळे. हमीभावान ज्वारी खरेदीसाठी करण्यात आलेला बनावट व्यवहार या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.आणि या सगळ्याचा थेट संबंध प्रहार पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाशी जोडला जात आहे. या घोटाळ्यात संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी या संस्थेचं नाव समोर आलं आहे. ही संस्था प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु यांच्या अध्यक्षतेखालील आहे. या ज्वारी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वंचितचे नेते निखिल गावंडे यांनी केली.

bacchu kadu News
Bacchu Kadu : प्रहार संघटना आक्रमक; बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मंत्री कोकाटेंच्या निवासस्थानी मशाल मोर्चा|VIDEO

नेमकं प्रकरण काय ?

बाजार समितीने नोडल एजन्सी म्हणून तालुका खरेदी-विक्री संघ आणि कुलदीप वसु अध्यक्ष असलेल्या संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची नेमणूक केली होती. यात संत श्री नरसिंग महाराज फार्मर्स प्रोडूसर कंपनीकडे जवळपास ११०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तर खरेदी-विक्री संघाकडे १२००च्या जवळपास शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नोंदणी केली होती. यात वसू यांच्या कंपनीच्या माध्यमातून १८०च्या जवळपास शेतकऱ्यांच्या नावाने बोगस ज्वारी खरेदी झाल्याचा आरोप होतो आहे.

bacchu kadu News
Bacchu Kadu News: शिंदे-फडणवीसांविरोधात मजबूत उमेदवार देणार; आमदार बच्चू कडू यांची मोठी घोषणा

अकोट तालुक्यातील जळगाव नहाटेच्या रामेश्वर साबळे यांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली आहे. मात्र त्यांचा नंबर लवकर न लागल्यामुळे त्यांना आपली ज्वारी कमी व्हावी, म्हणून त्यांना व्यापाऱ्याला विकावी लागली आहे. अन् हक्काच्या ३५०० च्या हमीभावावर त्यांना पाणी सोडावं लागलं आहे. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी यावर थेट आवाज उठवला आहे. यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com