शिंदेसेनेची बच्चू कडूंना विधानपरिषदेची ऑफर? कडूंच्या पक्षाचं शिंदेसेनेत विलिनीकरण होणार?

Bachu Kadu Shinde Sena Entry Mlc Offer Prahar Merger: बच्चू कडू शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगलीय..मात्र खरचं बच्चू कडू आमदारकीसाठी शिंदेसेनेसोबत जाणार का? कडूंच्या पक्षप्रवेशानंतर प्रहार पक्षाचं काय होणार? शिंदेसेनेनं कडूंपुढे नेमक्या कोणत्या अटी ठेवलेत?
Bachu Kadu’s meeting with Eknath Shinde fuels speculation over a possible political shift and Prahar party merger.
Bachu Kadu’s meeting with Eknath Shinde fuels speculation over a possible political shift and Prahar party merger.Saam tv
Published On

शेतकरी प्रश्नांवर महायुती सरकारला धारेवर धरणारे बच्चू कडू आता शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगलीय...आठवड्याभरापूर्वी बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली... आणि त्याचं भेटीनंतर शिंदेंनी बच्चू कडूंना विधान परिषदेसाठी ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.... मात्र शिंदेसेनेनं कडूंना ऑफर देताना काय अटी घातल्या आहेत...

शिंदेसेनेकडून बच्चू कडूंना विधान परिषदेच्या आमदारकीची आणि सहा महिन्यानंतर मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली...मात्र त्याआधी बच्चू कडूंना प्रहार जनशक्ती हा त्यांचा पक्ष शिंदेसेनेत विलीन करण्याची अट घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान, आमदारकीसाठी शिंदेसेनेत प्रवेश करावा, मात्र मंत्रिपद मिळाल्यानंतरच पक्ष विलीनकरणाचा विचार करा, असा आग्रह क़डूंच्या कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा आहे...दुसरीकडे विधान परिषदेसाठी शिंदेसेनेत अनेक इच्छुक आहेत.त्यामुळे कडूंनी पक्ष विलिनीकरणाचा निर्णय घेतल्यावर आमदारकीचं बोलू, असं स्पष्ट विधान संजय शिरसाटांनी केलयं...तर पक्ष विलीनीकरण करण्याआधी सरकार शेतकरी हिताचे काय निर्णय घेतंय याकडे लक्ष द्या, असा टोला नाना पटोलेंनी लगावलाय...

मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणारे बच्चू कडू शिंदेसेनेत जाण्यास खरच तयार आहेत का? यामागे कोणती कारणं असू शकतात ते पाहूयात..2024 च्या निवडणुकीत अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडूंचा भाजपच्या प्रवीण तायडेंनी पराभव केला...प्रहार जनशक्तीनं 2024 च्या निवडणुकीत तब्बल 33 उमेदवार उभे केले होते... त्यातील एकाही उमेदवाराला जनतेनं निवडून दिलं नाही... त्यामुळे शेतकरी नेते म्हणून बच्चू कडूंची ताकद कमी झाल्याची चर्चा आहे...विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पक्षाला फक्त साडेतीन लाख मतं मिळाली...त्यात बच्चू कडूंनाच 66 हजार 70 मते मिळाली होती... त्यामुळे प्रहार पक्षाची ताकद कडूंपूरती मर्यादीत असल्याचं चित्र आहे...त्यामुळे बच्चू कडूंनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे...

कडू नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत असतात..मात्र प्रहार पक्ष शिंदेसेनेत विलीन झाल्यास कडूंची स्वतंत्र ओळख धोक्यात येणार, हे निश्चित...त्यात सहा महिन्यानंतर कडूंना मंत्रिपद मिळणार का? अनेक वर्षांपासून प्रहारसाठी झटणारे कार्यकर्ते शिंदेसेनेच्या राजकारणात फिट बसतील का? असे अनेक प्रश्न आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com