

>> अमर घटारे
Bacchu Kadu On Maharashtra Cabinet Expansion: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''मंत्रिमंडळ विस्तार लवकर करून मोकळं केलं पाहिजे. नाही तर सांगून द्या 2024 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल म्हणून.''
ते म्हणाले, 'एका-एका मंत्र्यांकडे 8 खाते आहेत. कामे होत नाही. फाईल पडल्या आहेत. 2024 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील, नाही तर मी राहील.'' अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.
जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं. यावर बच्चू कडू यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत म्हणाले, मंत्रिमंडळचा विस्तार होण्याची घाई मीडियाला जास्त झालेली दिसते. तुम्हाला कुणी सांगितले असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. (Latest Marathi News)
ते म्हणाले, ''विस्तार हा महत्त्वाचा नाही. आमचे काम होत आहे, हे आमच्यासाठी चांगले आहे. कुणाला मंत्रिमंडळातून डचू मिळेल, असं वाटत नाही. मात्र ज्याची कामगिरी खराब असेल त्याला मिळत असेल, तर चांगलीच गोष्ट आहे.''
भिडेंच्या वक्तव्यावर कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन नाही. तसेच तिरंगा हा राष्ट्रध्वज नाही, अशी वादग्रस्त प्रतिक्रिया शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी दिली होती. यावर बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, असे वक्तव्यं जर इतर धर्मीयांनी केलं असतं. तर आपण त्याला देशद्रोही म्हटलं असतं. संभाजी भिडे यांना आम्ही जेष्ठ आणि श्रेष्ठ मानत होतो. मात्र ते श्रेष्ठ नाही हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यतून दाखवून दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.