Bribe
Bribesaam tv

औसा : तीन हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदारास रंगेहाथ अटक!

औसा पोलिसात भादंवि 294, 323, 506 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात तडजोडीसाठी पाच हजारांची मागणी!
Published on

लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराने एका प्रकरणात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली. या सौद्यातील तीन हजार रुपये स्वीकारताना या हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून, सदर पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा :

या संदर्भात अधिक माहिती अशी की, औसा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राजेंद्र गोरख लामतुरे यांनी एका प्रकरणात तक्रारदार यांना मदत करतो म्हणून पाच हजारांची मागणी केली. त्यातील तीन हजार रुपये स्वीकारताना लामतुरे यांना अटक करण्यात आली आहे. औसा पोलिसात भादंवि 294, 323, 506 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस हवालदार लामतुरे यांनी तक्रारदारास पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती पहिला हप्ता 3 हजार व दुसरा हप्ता 2 हजार अशी लाच मागितली.

Bribe
निलंगेकरांचे आंदोलन म्हणजे खोटारडेपणा आणि घाणेरडेपणा : अभय सोळुंके

शुक्रवारी पाच वाजण्याच्या सुमारास लामतुरे यांनी तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने ही कारवाई केली आहे. पुढील तपास अन्वर मुजावर करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com