निलंगेकरांचे आंदोलन म्हणजे खोटारडेपणा आणि घाणेरडेपणा : अभय सोळुंके

"पाणी गढूळ दिसण्यासाठी पाण्यात मिसळले रंग; मनपाच्या दारात भाजपची स्टंटबाजी."
 अभय सोळुंके । Abhay Salunke
अभय सोळुंके । Abhay Salunke SaamTVNews

लातूर : लातूर महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या दोन आठवड्यांपासून नळाद्वारे पुरवठा करण्यात आलेल्या पाण्याचा रंग काहीसा पिवळसर आला होता, त्यानुसार नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून मनपाच्या वतीने पाण्याची टेस्ट घेऊन हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हा मुद्दा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करत भाजपच्या वतीने दोन दिवसांपासून शहरात बॅनरबाजी करत आज आंदोलनाचा इशारा दिला होता.

हे देखील पाहा :

मात्र, प्रत्यक्षात पाण्याचा रंग जास्त गढूळ दिसावा यासाठी पाण्यात पिवळा आणि लालगुलाबी रंग मिसळून ते पाणी रिकाम्या बाटल्यात भरण्यात आले. दोन टेम्पो भरून रंगमिश्रित पाण्याच्या बाटल्या भरून आणून पालिकेच्या दारात ओतण्यात आल्या. हे आंदोलन पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. लोकांच्या देखील लक्षात आले कि हे पाणी गढूळ नसून रंगमिश्रित आहे. आता भाजपचे आजचे आंदोलन हे काँग्रेस नेत्यांना आयतं कोलीत मिळालेले आहे.

 अभय सोळुंके । Abhay Salunke
दोनशे कोटींच्या आरोपाचे 'ते' व्हायरल पत्र केवळ बदनामीसाठी : कृष्ण प्रकाश

यावर अखिल भारतीय काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके (Abhay Salunke) यांनी कडाडून टीका केली आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी हळद टाकून पिवळे पाणी नागरिकांना पुरवठा केला म्हणून आंदोलन केले. हा शुध्द खोटारडेपणा आणि घाणेरडेपणा असून जिल्ह्यात जेष्ठ नेत्यांनी उत्तम परंपरा घालून दिली असून याला काळिमा फासल्याचे म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com