Aurangzeb Tomb: औरंगजेबच्या कबरीवरून वातावरण तापलं, प्रतिकात्मक थडग्याला पायाखाली तुडवलं

Protest Aurangzeb Tomb In State: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबच्या कबरीवरून राज्यभरात आंदोलन केली जात आहेत. औरंगजेबची कबर महाराष्ट्रात कशाला पाहिजे, असा सवाल नितेश राणे यांनी केलाय.
Aurangzeb Tomb
Aurangzeb Tomb Protest In StateSaam tv
Published On

औरंगजेबच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण तापलंय. पुणेसह, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर अशा ठिकाणी आंदोलन पेटले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेकडून केली जात आहे. कबर हटवण्याच्या मागणीसाठी हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेब कबर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

नागपूर: औरंगजेबच्या प्रतिकात्मक थडग्याला पायाखाली तुडवलं

नागपुरात औरंगजेबच्या कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवे झेंडे हातात घेऊन आंदोलन करण्यात येत आहे. औरंगजेब क्रूर शासक होता. त्याने हिंदूंचे मंदिर तोडले त्याच थडगे महाराष्ट्रातून हटवण्यात यावे, या मागणीसाठी नागपुरात आंदोलन केले जात आहे. महाराष्ट्र गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहेत. नागपूरमध्ये आंदोलकांनी औरंगजेबचा थडगे आणून त्याला पायदळी तुडवले. त्यानंतर औरंगजेबचे प्रतिकात्मक थडग्याला पायाखाली तुडवण्यात आलं.

Aurangzeb Tomb
Maharashtra Politics: औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन फुलं उधळण्याची गरज काय? भाजप नेत्याचा विरोधकांना संतप्त सवाल

नांदेड: रास्ता रोको आंदोलन

औरंगजेबच्या कबरीवरून सध्या राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलंय. छत्रपती संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबची कबर उखडून टाकण्याची मागणी बजरंग दलाने केलीय. संपूर्ण महाराष्ट्रात याच मागणीसाठी बजरंग दलाने आंदोलन केले. या आंदोलनाला नांदेडमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळाला. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बजरंग दलाने निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन केले.

शासनाने औरंगजेबाची कबर तात्काळ उखडून टाकावी, अन्यथा बजरंग दल येत्या काही दिवसात ही कबर उखडून टाकेल, असा इशारा या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला. या आंदोलनात जिल्हाभरातील बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

छत्रपती संभाजीनगर

औरंगजेबची कबर उखाडून टाकण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जात आहे. विहिंपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Aurangzeb Tomb
Chhatrapati Shivaji Maharaj Temple : महाराष्ट्रातील पहिल्या शिव मंदिराचे अयोध्या कनेक्शन, नेमकं कसं आहे हे मंदिर?

कोल्हापूर : औरंगजेबाची कबर आणली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठ्या प्रमाणात वाद पेटलाय. औरंगजेबाची कबर काढून टाकावी अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू, असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिला होता. याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरदेखील बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रतिकात्मक औरंगजेबाची कबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला. मात्र तो प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलाय.

औरंग्याची कबर महाराष्ट्रामध्ये कशाला?

आमच्या महाराष्ट्रामध्ये जी औरंग्याची कबर आहे, ती आठवण आम्हाला नको आहे. ही हिंदू समाजाची भावना आहे. ज्या औरंग्याने छत्रपती संभाजी महाराज यांना हाल करून मारले त्याची कबर कशाला? काहींना ती आठवण वाटते मात्र ती घाण आम्हाला नको आहे. कोणतीच चिन्हे नको जी आमच्या स्वराज्याच्या विरोधात उभे राहिले. ती घाण नकोच. ज्यांना आठवण वाटते त्यांनी पाकिस्तानमध्ये घेऊन जावं. बजरंग दलाने विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते हे हिंदू समाज बोलतो, ती भावना सगळ्यांना कळले पाहिजे. म्हणूनच राज्यभरात आंदोलन सुरू आहेत, असं भाजप नेते नितेश राणे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com