Aurangabad : शेतकऱ्याचा मुलाचा नाद नाही करायचा! लग्नाला मुलगी शोधण्यासाठी तरुणाचा थेट आमदाराला फोन

तरुणाने लग्नाला मुलगी शोधण्यासाठी चक्क आमदाराला कॉल केल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चर्चा
Aurangabad
Aurangabad Saam Tv
Published On: 

Aurangabad News : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड-सोयगावचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना एका तरुणाने फोन करत चक्क लग्नासाठी मुलगी शोधून देण्याची गळ घातली आहे. तरुणाने लग्नाला मुलगी शोधण्यासाठी चक्क आमदाराला कॉल केल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

Aurangabad
Chhagan Bhujbal : राज्यातील ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची छगन भुजबळ यांची मागणी

लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, खासदारांना रस्ते, पाणी, वीज, शिक्षण अशा प्रकारची कामे करून द्या म्हणून फोन करणे अपेक्षित आहे. मात्र या तरुणाने चक्क लग्नासाठी तुमच्या सर्कलमधील एखादी मुलगी शोधा, अशी गळ घातली आहे.

औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील एका तरूणाने लग्नासाठी मुलगी मिळत नाही, तुमच्या सर्कलमध्ये पहा ना, म्हणत कन्नडचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना फोन केला. या दोघांमधील संभाषणाचा आडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आमदारांनी देखील त्या तरुणाला नाराज न करता तुमचा बायोडाटा पाठवून द्या, बघतो म्हणत आश्वासन दिले.

Aurangabad
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या तालावर शिरूरकर थिरकले; लहान-मोठे सर्वच नृत्य पाहून बेभान

सध्या शेतकरी मुलांची लग्न होत नाहीत, हा सामाजिक प्रश्न गंभीर बनला आहे. तर अनेकांची लग्नासाठी मुलगी पाहून देतो म्हणून फसवणूक होते याची देखील शेकडो उदाहरणे समोर येत आहेत. 

शेतकरी मुलाला मुली मिळेना

ग्रामीम भागातील तरुण नोकरी नसलेले आणि शेती करून उदरनिर्वाह करत आहेत. मात्र, या मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. मुंबई, पुण्यात नोकरी असणाऱ्या मुलांना विवाहासाठी मागणी वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांचे लग्न जुळणे अवघड झाले आहे.

'जगाचा पोशिंदा' म्हणून ओळखणाऱ्या शेतकरी मुलांना लग्नासाठी पै-पाहुण्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. यामुळे वैतागलेल्या शेतकरी मुलाने थेट आमदार उदयसिंह राजपूत यांनाच फोन केला. या कॉलची चर्चा जिल्ह्यात सर्वदूर पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com