

नाशिक : औरंगाबादेत एकतर्फी प्रेमातून तरूणीची निर्घुण हत्या (Murder ) करणाऱ्या नराधमाच्या नाशिक ग्रामीण पोलीस आणि औरंगबाद पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नाशिक ग्रामीण आणि औरंगाबाद (Aurangabad ) पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून आरोपीला अटक केली आहे. संशयित आरोपी आश्रयासाठी नाशिकच्या लासलगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत आरोपी शरणसिंगला बेड्या ठोकल्या आहेत. औरंगाबादहून ट्रकमधून नाशिकमध्ये (Nashik ) येत असताना पोलिसांनी सापळा रचत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अटकेनंतर आरोपीविरोधात पुढील कारवाई सुरू केली आहे. (Nashik Latest Crime News In Marathi )
हे देखील पाहा -
आरोपी शरण सिंग याचे ग्रंथी सुखप्रीत कौर प्रीतपाल सिंग या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेम होते. ही विद्यार्थिनी बीबीएच्या पहिल्या वर्गात शिकत होती. घटनेच्या दिवशी हे दोघे एका कॅफेमध्ये गेले होते. त्यावेळेस त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर शरणसिंगने तिला भरदिवसा देवगिरी कॉलेज जवळीलभागातून फरफटत नेलं. शरणसिंगने ग्रंथी सुखप्रीतला अक्षरश: घटनास्थळी ओढत नेले. त्यादरम्यानची घटनाही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
दरम्यान, शरणसिंगने ग्रंथी सुखप्रीतला घटनास्थळी नेत धारधार शस्त्राने गळा चिरला. आरोपीने अनेक वार देखील ग्रंथी सुखप्रीतच्या पाठीवर केले. तिची हत्या करत शरणसिंगने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली होती. पालकवर्गातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. हत्या केल्यानंतर आरोपी हा ट्रकमधून नाशिकच्या लासलगाव जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी नाशिकच्या लासलगावमध्ये सापळा रचला. नाशिक ग्रामीण पोलीस आणि औरंगाबाद पोलिसांनी आरोपी शरणसिंगला बेड्या ठोकल्या. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील आणि औरंगाबाद पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.