Aurangabad News : प्रेमाला नाही सीमा…! लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबादला; आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा

Aurangabad Bride And London Groom Ties Knot: औरंगाबागेत एक आगळावेगळा विवाह सोहळा झाला आहे.
Aurangabad News
Aurangabad News Saam tv
Published On

नवनीत तापडीया

Aurangabad Marriage News : औरंगाबागेत एक आगळावेगळा विवाह सोहळा झाला आहे. औरंगाबादची सांची इंग्लंडच्या एका मुलाच्या प्रेमात पडली, दोघांचे कुटुंब लग्नासाठी तयार झाले आणि अगदी भारतीय पद्धतीनं धुमधडाक्यात हा विवाह सोहळा गुरुवारी पार पडला. या आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्यांची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

भारतीय गाण्यावर थिरकणारं इंग्लंडमधील (England) कुटुंबीय अगदी भारतीय वेश परिधान करून लग्नात ही सगळी मंडळी सहभागी झाली. त्याला कारणही म्हणजे लग्न आहे यांच्या घरच्या एकुलत्या एक मुलाचं म्हणजे एडवर्ड्च.

औरंगाबादच्या सांची नावाच्या एका मुलीच्या प्रेमात एडवर्ड पडला. 2019 पासून इंग्लंड मध्ये हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांनी 3 वर्षांनी घरी त्यांनी सांगितलं आणि घरच्यांनी लग्नासाठी होकार दिला. मात्र अट एकच होती की लग्न भारतात म्हणजे औरंगाबादेत व्हावं आणि तेही भारतीय बौद्ध पद्धतीने.

Aurangabad News
Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराचा लग्न मंडप सजला! शाहरुखचा बॉडीगार्ड घेतोय सोहळ्याच्या सुरक्षिततेची विशेष काळजी

एकुलता एक मुलगा असल्याने एडवर्डच्या कुटुंबाने होकार दिला आणि थेट कुटुंबासह त्यांनी औरंगाबाद गाठलं. या लग्नाची धुमधडाक्यात वरात निघाली. ज्यात एडवर्डचे कुटुंबीय आणि रगडे कुटुंबीय एकत्र ताल धरतंय. त्यानंतर बौद्ध पद्धतीने विवाह सोहळा पार पडतोय. यावेळी एडवर्डसह त्याच्या कुटुंबीयांनी सुद्धा सर्व विधीत सहभाग घेतला. यानंतर वधू वर दोघांनीही लग्नाचा आनंद व्यक्त केला.

ब्रिटनमध्ये लग्न म्हणजे एका तासाचे काम असते मात्र भारतात लग्न म्हणजे चार दिवसांचं काम आहे आणि हे सगळं आनंदादायक असल्याची प्रतिक्रिया यावेळेस एडवर्डच्या वडिलांनी दिलीय. तर त्याच्या बहिणीने सुद्धा भारतीय पद्धतीने लग्नहोत असल्याने आनंद होत असल्याचा सांगितलं. जातीपातीच्या भिंती तोडून हे लग्न होत असल्याचा खास आनंद असल्यास मुलीच्या वडिलांनी सांगितलंय.

Aurangabad News
Prajakt Deshmukh: नाशिक-मुंबई हायवेला कुणी वाली आहे का? अपघातानंतर प्राजक्त देशमुखने ट्विट करत केला संतप्त सवाल

औरंगाबादची (Aurangabad) सांची यानंतर कायमची सातासमुद्र पार राहायला जाणार याचं दुःख आहे. मात्र मुलगी एका चांगल्या कुटुंबात गेली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया यावेळेस रगडे कुटुंबीयांनी दिली. या लग्नामुळे ब्रिटिश कुटुंबाची आणि एका भारतीय कुटुंबाची नाळ भारतीय पद्धतीने यावेळेस घट्ट जोडल्या गेली हे मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com