मुलाच्या डोळ्यादेखत आईनं तडफडून सोडले प्राण; खचलेल्या तरुणाने तलावात मारली उडी

आईच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या तरुणाने नागपुरमधील (Nagpur) अंबाझरी तलावामध्ये उडी घेत आत्महत्या
मुलाच्या डोळ्यादेखत आईनं तडफडून सोडले प्राण; खचलेल्या तरुणाने तलावात मारली उडी
मुलाच्या डोळ्यादेखत आईनं तडफडून सोडले प्राण; खचलेल्या तरुणाने तलावात मारली उडीSaam Tv
Published On

नागपूर : आई आणि बाळाचे नाते हे जगामधील सर्वात घट्ट नाते मानले जाते. आपल्या बाळावर कसलेही संकट आले तर आई आपला जीव धोक्यात घालून बाळाचा जीव वाचवत असते. पण आईचाच मृत्यू झाल्यानंतर बाळाची काय अवस्था होऊ शकते? याचा प्रत्यय नागपुरामध्ये (Nagpur) दिसून आला आहे. येथील एक तरुणाला आईचे निधन होऊन २ महिने उलटल्यानंतर देखील, त्याला दु:खातून स्वत:ला सावरता आले नाही. (attempts to commit self slaughter by jump into ambazari lake nagpur)

आईच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या तरुणाने नागपुरमधील (Nagpur) अंबाझरी तलावामध्ये (Ambazari lake) उडी घेत आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केले आहे. पण त्याचवेळी अंबाझरी तलावात पोलीस असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी काही जलतरणपटूंच्या मदतीने तरुणाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी तरुणाची समजूत घालून त्याला वडिलांच्या ताब्यात दिले आहे.

हे देखील पहा-

आईच्या निधनामुळे तरुणाची झालेली ही अवस्था पाहून पोलिसांना देखील गहिवरून आले आहेत. खरेतर, नागपुरात अंबाझरी तलावामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच एका पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस (Police) पथक स्थानिक जलतरण पटूच्या मदतीने संबंधित मृतदेह बाहेर काढत होते. त्याचवेळी एका २० वर्षीय तरुणाने तलावात उडी घेतल्याचे पोलिसांना दिसले होते. (attempts to commit self slaughter by jump into ambazari lake nagpur)

मुलाच्या डोळ्यादेखत आईनं तडफडून सोडले प्राण; खचलेल्या तरुणाने तलावात मारली उडी
मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याची आत्महत्या; लष्करी कॅम्पमध्ये स्वत:वर गोळी झाडत संपवलं जीवन

उपस्थित पोलिसांनी क्षणाचा देखील विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जलतरणपटूच्या मदतीने तरुणाला पाण्यामधून बाहेर काढण्यात आले आहे. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर, तरुणाने आईच्या आठवणीने ढसाढसा रडायला सुरुवात केली. संबंधित २० वर्षीय युवकाच्या आईचा मृत्यू ऐन दिवाळीच्या दिवशी कारंजालाड जवळ एका अपघातामध्ये झाला होता. आईचा झालेला अपघात त्याने आपल्या डोळ्याने पाहिला होता.

आईला डोळ्यासमोरच प्राण सोडताना पाहिल्याने तरुणाला नैराश्य आले होते. मागील २ महिन्यांपासून ते आईच्या आठवणीने व्याकुळ झाला होता. त्यामधूनच हा युवक रविवारी सकाळी घराबाहेर पडला होता. यानंतर त्याने अंबाझरी तलावामध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तरुणाची समजूत काढून त्याला वडिलांच्या ताब्यात दिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com