वृत्तसंस्था : उत्तर काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील द्रांग्यारी चौकीबाल येथे सेवेवर असणाऱ्या एका भारतीय जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (indian soldier) केली आहे. संबंधित जवानाने आज पहाटे स्वत:च्या सर्व्हिस रायफल मधून गोळी झाडून आयुष्याचा शेवट केला आहे. साखर झोपेच्या वेळेस गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर कॅम्पमध्ये खळबळ उडाली आहे.
हे देखील पहा-
या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून पुढील तपास पोलीस (Police) करत आहेत. संदीप अर्जुन शिंदे असे आत्महत्या (Suicide) करणाऱ्या भारतीय जवानाचे नाव आहे. तो हवालदार रँकवरील जवान आहे. त्याची पोस्टींग द्रांग्यारी चौकीबाल येथे करण्यात आली होती. आज पहाटे साडेचारच्या वाजेच्या सुमारास शिंदे यांनी स्वत:च्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
गोळी झाडल्यानंतर जखमी अवस्थेतील शिंदे यांना काही जवानांनी तातडीने श्रीनगर (Srinagar) येथील लष्करी रुग्णालयात (military hospital) हलवले आहे. पण मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे जवानाचा वाटेतच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मृत जवान शिंदे यांनी नेमकी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली आहे, याची कोणती देखील माहिती अद्याप समोर आली नाही.
या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे, २ दिवसाअगोदर जम्मू काश्मीर मधील रामबन जिल्ह्यातील महू बाल याठिकाणी एका मेजरने देखील आत्महत्या केली होती. संबंधित मेजरने ११ डिसेंबर रोजी रात्री आपल्या निवासस्थानी गोळी झाडून आयुष्याचा शेवट केला होता. ही घटना ताजी असतानाच, आणखी एका जवानाने गोळी झाडून आपले जीवन संपवले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.