Sangola News: सांगोल्यातील बंडखोरीला शरद पवारांची साथ? आशिर्वाद घेऊनच ठाकरे गटात प्रवेश केला, दिपक साळुंखेंचा गौप्यस्फोट

Sangola Assembly Election 2024: शेकापचे नेते जयंत पाटील यांनी डाॅ. बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी जयंत पाटील यांनी आम्ही महाविकास आडीत असून शरद पवार यांचा पाठिंबा शेकापला आहे, असा दावा‌ केला आहे.
Sangola News
Sangola Assembly Election 2024Saamtv
Published On

Maharashtra Assembly Election 2024: सांगोल्याच्या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये सध्या वाद होताना दिसत आहे. सांगोल्यामधून ठाकरे गटाने दिपक आबा साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केल्याने शेकापकडून डाॅ. बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेकापच्या उमेदवाराला शरद पवार गटाचा पाठिंबा असेल, असेही बोलले जात आहे. अशातच शरद पवारांचा आशीर्वाद घेऊनच मी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला, असा मोठा गौप्यस्फोट दीपक साळुंखे यांनी केला आहे.

Sangola News
Maharashtra Politics : नकटं असावं, धाकटं नसावं! महायुती-मविआत शिवसेना दोन आकड्यांवर, VIDEO

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दीपक साळुंखे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आर्शिवाद घेऊनच मी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या पाठिंब्यावरून सांगोल्यात राजकारण रंगू लागले आहे. अजित पवार गटाचे जिल्हाअध्यक्ष दीपक साळुंखे यांनी अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

त्यानंतर दीपक साळुंखे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली‌ आहे. साळुंखे यांच्या उमेदवारीमुळे सांगोल्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून शेकापने बंडाचा झेंडा फडकवला आहे. काल शेकापने मोठा मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन केले. त्यामध्ये शेकापचे नेते जयंत पाटील यांनी डाॅ. बाबासाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी जयंत पाटील यांनी आम्ही महाविकास आडीत असून शरद पवार यांचा पाठिंबा शेकापला आहे, असा दावा‌ केला आहे.

Sangola News
Jalgaon Accident : नातेवाईकांना भेटण्यासाठी जाताना अपघात; पित्याचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे सांगोल्याचे उमेदवार दीपक साळुंखे यांनी‌ही शरद पवारांचा आशीर्वाद घेऊनच ठाकरे गटातून उमेदवारी घेतल्याचं सांगितले आहे. राजकारणात कधी‌ काही घडू शकते. मी जनतेचा उमेदवार आहे. शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी ही मला लागलेली लाॅटरी आहे. त्यामुळे निवडणूकीत आपला विजय नक्की आहे असा दावा ही साळुंखे यांनी केला आहे. सांगोल्यात शरद पवारांचा पाठिंबा साळुंखेंना की देशमुखांना मिळणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

Sangola News
Maharashtra Politics: संस्कृती बदलण्याची वेळ आली, सुजय विखेंनी पुन्हा थोरातांना डिवचले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com