मुंबई : महाराष्ट्रातील यंदाच्या विधानसभा निवडणुका अभूतपूर्व आहेत. पहिल्यांदाच तीन मोठे पक्ष एकत्रितपणे युती किंवा आघाडीतून विधानसभा निवडणुकांना सामोरे जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांना जागावाटप निश्चित करण्यास विलंब होतोय.. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊन 24 तास उलटले तरी जागावाटप जाहीर झालेले नाही. त्यामुळे जागावाटपाचा पेच अजुनही कायम आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीच्या सरशीची पुनरावृत्ती होणार, की महायुती महाराष्ट्रातील सत्ता कायम राखणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फटका बसणार की फायदा होणार, यावरही सर्वांचा नजरा आहेत. तर दुसरीकडे राऊतांनी शिवसेना ठाकरे गट सेंचुरी मारेल असा विश्वास व्यक्त केलायं.
याआधी युतीत शिवसेनेला किती जागा मिळत गेल्या पाहूया...
युतीत सेनेला किती जागा?-
2019 - 124 जागा - 56 आमदार विजयी
2014 - स्वबळावर 286 जागा - 63 आमदार विजयी
2009 - 160 जागा - 45 आमदार विजयी
2004 - 163 जागा - 62 आमदार विजयी
1999 - 161 जागा - 69 आमदार विजयी
1995 - 169 जागा - 73 आमदार विजयी
त्यामुळे एकसंध आणि युतीत असलेल्या शिवसेनेला नेहमीच तीन आकडी जागा मिळाल्याचं चित्र आहे. मात्र मविआत ठाकरे गटाला 90 ते 95 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंही भाजपकडून अधिकाधिक जागा पदरी पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. गृहमंत्री अमित शहांकडे 90 जागांची मागणी केली आहे. मात्र महायुतीत शिवसेना भाजपता लहान भाऊच राहणार आहे. याआधी युतीत 'मोठा भाऊ-लहान भाऊ' यावर कधी चर्चाच होत नसे. बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेनेच्या मागे भाजप होता. आज शिवसेनेची भाजपमागे फरपट होत आहे. म्हणूनच म्हणतात नकटं असाव,पण धाकटं नसावं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.