खरातचा कोठडीतही काळा कारनामा? तुरुंगात पोलिसांनाही भीती दाखवण्याचा डाव

Ashok kharat Jail Police Manipulation Attempt: खरात तुरुंगात गेला... मात्र तिथंही त्याचे चाळे काही कमी होत नाहीत.. त्यानं आता थेट पोलिसांनाही जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.. तो नेमका कसा? आणि पोलिसांनी खरातचा डाव कसा उधळून लावलाय..पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Accused Kharat attempts psychological manipulation inside jail, but police remain alert and foil his tactics.
Accused Kharat attempts psychological manipulation inside jail, but police remain alert and foil his tactics.Saam Tv
Published On

ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्माच्या आडून महिलांना भीती घालून शोषण करणारा हा आहे विकृत कॅप्टन खरात... महिलेनं तक्रार केल्यानंतर खरातचं बिंग फुटलं... त्यानंतर खरातच्या काळ्या कारनाम्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले... आणि एसआयटीनं भोंदू खरातच्या मुसक्या आवळल्या... मात्र या नराधमाचे कारनामे कोठडीतही कमी होताना दिसत नाहीत...महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या खरातनं कोठडीत पोलिसांनाही हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय... तो नेमका कसा? पाहूयात...

खरातच्या बंदोबस्तासाठी पोलीस तैनात होते... अचानक खरातनं सहानुभूती मिळवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याचे भविष्य सांगायला सुरुवात केली. कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना आणि भविष्यातील संभाव्य घडामोडी सांगायला लागला.. तुमचं भविष्य सांगतो. तुम्हाला काय होणार हे मला माहीत आहे, असा दावा करत होता.

एका बाजूला खरातने महिलांना भविष्याची भीती घालून अत्याचार केले.. आता पोलिसांना भविष्याबद्दल भीती घालत होता.. मात्र पोलिसांनी खरातचा डाव उधळून लावला...खरातचे भविष्यवाणीचे नाटक उडवून लावत पोलिसांनी खरातला कायद्याचा दणका दिला...

आता मुद्दा असा आहे की, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांना गंडा घालणाऱ्या कॅप्टन खरातला स्वतःचं भविष्यही माहीत नाही... त्यामुळेच हा नराधम तुरुंगात आहे... त्यामुळे नाशिक पोलीस जरी खरातच्या काळ्या कारनाम्यांचे बळी ठरले नसले तरी राज्यात अनेक बुवा बाबा असे डाव खेळत असतात... त्यामुळे खरातसारख्या भोंदूंचे डाव उधळून टाकण्यासाठी सगळ्यांनीच विज्ञानवादी दृष्टीकोन बाळगला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com