कॅप्टन खरातचे भक्त, ते 9 मंत्री कोण? 'घृणास्पद विधी करणारे मंत्री कोण ?'

Ashok Kharat Controversy 9 Ministers Allegations: कॅप्टन अशोक खरातवरील आरोपांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. अशातच मंत्रिमंडळातील 9 मंत्री खरातचे भक्त असल्याचा खळबळजनक दावा विरोधकांनी केलाय... ते 9 मंत्री कोण आहेत? मंत्र्यांनी खरातसोबत कोणते घृणास्पद विधी केलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Political controversy intensifies in Maharashtra as allegations surface linking ministers to self-styled godman Ashok Kharat
Political controversy intensifies in Maharashtra as allegations surface linking ministers to self-styled godman Ashok KharatSaam Tv
Published On

तंत्रमंत्र काळ्या जादूच्या नावाखाली श्रद्धेचा खेळ करून महिलांवर अत्याचार करणारा हा आहे... भोंदूबाबा अशोक खरात... या खरातचे न बघवणारे कारनामे आता संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय.. याच खऱातशी संबंधित आता अनेक नाव पुढे येत असतानाच संजय राऊतांनी मंत्रिमंडळातील 9 मंत्री खरातचे भक्त होते आणि ते घृणास्पद विधीही करायचे असा आरोप करत खळबळ उडवून दिलीय....

या भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटोही आता व्हायरलं होत आहेत..

उपमुख्य़मंत्री एकनाथ शिंदे

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

खासदार निलेश लंके

आमदार दीपक केसरकर

आमदार जयंत पाटील

आमदार मिलिंद नार्वेकर

यासारख्या राजकीय नेत्यांसोबतचे भोंदूबाबा खरातचे फोटो समोर आले आहेत.

ज्याचा नावाचा- पदाचा वापर करून खरातने कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमवल्याचाही आरोप केला जातोय.. दरम्यान भोदूबाबा अशोक खरातच्या राजकीय कनेक्शनमुळे आता राज्यातलं राजकारण चांगलच तापलयं... महिलांचे शोषण करण्यासाठी अध्यात्माचा मुखवटा वापरणाऱ्या या बाबाला कुणाचे अभय होते? मंत्रिमंडळातील कोणते 9 मंत्री खरातचे भक्त आहे... त्यांनी खरचं अघोरी विधी केलेत का? अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं राजकारण्याचं हे भक्तीप्रेम देशाला आणि राज्याला कोणत्या दिशेने घेऊन जाईल, हा खरा प्रश्न आहे... मात्र आता, गृहखातं या प्रकरणाची सखोल चौकशी करून 'कॅप्टन फाईल्स'मधील त्या 9 मंत्र्यांची नावं समोर आणणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com