

अशोक खरात प्रकरणी मोठी अपडेट समोर
नराधमाच्या विरोधात १६० जीबी डिजिटल पुरावे हाती
खरातचे सर्व काळे कारनामे तपास अधिकाऱ्यांच्या हाती
भोंदू अशोक खरात प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. नराधम खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्याच्याविरोधात तब्बल १६० जीबी डिजिटल पुरावे तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. या पुराव्यामुळे खरातच्या कारनाम्यांचा काळा चेहरा समोर आला आहे.
खरात प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक अहवाल एसआयटीकडे सादर केला आहे. त्यामुळे तपासाचा वेग वाढला आहे. एकूण ४ डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपास अधिकाऱ्यांकडे पुराव्यांमुळे खरातभोवतीचा फास अधिक घट्ट झाला आहे.
प्रत्येक पुराव्याला A, B, C कोडवर्ड आहे. ‘A’ मध्ये लैंगिक अत्याचाराचे गंभीर संकेत दिले आहेत. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 कालावधीतील हालचालींचा तपशील हाती लागला आहे. त्याच्या विरोधातील पुरावे कॅनडा कॉर्नर कार्यालयातून जप्त करण्यात आले आहेत. 32 GB + 16 फोल्डर डेटा, 2 पेन ड्राईव्ह + 64GB OTG डिव्हाइस आणि लॅपटॉपसह सर्व डेटा SIT कडून स्कॅन करण्यात आला आहे.
IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट
तत्पूर्वी, नाशिकच्या नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचारी लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. 'इंटरव्ह्यू फॉर्म'चा गैरवापर करून कंपनीत महिलांचे शोषण करण्यात आल्याचे उघड झालं आहे. SIT तपासात धक्कादायक उलगडा झाला आहे. आरोपींनी नोकरीसाठी भरलेल्या इंटरव्यू फॉर्ममधील वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून महिलांना जाळ्यात ओढल्याचं निष्पन्न झालं आहे.
आरोपींकडून पदोन्नती आणि पगारवाढीचे आमिष दाखवून महिलांना जाळ्यात ओढून त्याचबरोबर काही प्रकरणांत ब्लॅकमेल करून महिलांचे शोषण केले जात होते. वीकेंड ट्रिपच्या नावाखाली तसेच कॅफे, हॉटेलमध्ये नेत जवळीक निर्माण करत शोषण केल्याचं समोर आलं आहे. सर्व आरोपींची पोलीस कोठडी आज संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.