अशोक खरात प्रकरणात पुणे कनेक्शन उघड
सीए ललित पोफळे यांचे नाव तपासात समोर
कोट्यवधींच्या आर्थिक व्यवहारांची माहिती उघड
देशातील विविध शहरांमध्ये प्रॉपर्टी गुंतवणूक
भोंदूबाबा अशोक खरातनं ज्योतिषी असल्याचे सांगून अनेक महिलांची फसवणूक केली. त्याने कोट्यवधीची माया जमवलीय. या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. त्याचे आर्थिक व्यवहार पुण्यातला असून तो खरातच्या ट्रस्टवर ५ वर्षे ट्रस्टी होता. सीए आणि खरातचे एकमेकांच्या खात्यावर पैशांची देवाणघेवाण करत होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. अशोक खरातच्या काळ्या पैशांची गुंतवणूक सीए करत होता. त्यानं पुणे, नोएडा, दिल्ली आणि मुंबईमध्ये प्रॉपर्टी घेतल्याची देखील माहिती तपासातून उघड झाली आहे.
नाशिक येथील भोंदुबाबा खरात प्रकरणातला बडा मासा अद्याप बाहेर आहे. खरातचे आर्थिक व्यवहार संभाळणारा सीए पुण्यातला असून ललित पोफळे असे त्याचे नाव असून तो सीए आहे. तो खरातचे अर्थिक व्यवहार संभाळायचा.सीए ललित पोफळे खरातच्या ट्रस्टवर पाच वर्षे ट्रस्टी होता. खरातची सर्व आर्थिक कुंडली सीए ललित पोफळेच्या हातात आहे. ललित पोफळे खरातच्या पैशांची गुंतवणूक करायचा. खरात हा ललित पोफळेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या काळ्या पैशांची गुंतवणूक करायचा.
सीए ललित पोफळेने देशातील एका बड्या बाबाच्या कंपनीचा आयपीओ आणण्यात मदत केली होती. त्याच धर्तीवर पोफळे हा अशोक खरातची कंपनी स्थापन करुन त्याचाही आयपीओ आणण्याचा तयारीत होता. खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एसआयटी सीए ललित पोफळेची चौकशी करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.
दरम्यान, भोंदूबाबा खरातसंदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली. स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा भोंदूबाबा अशोक खरात दहावी फेल आहे. तथाकथित अंकशास्त्रतज्ज्ञ दहावीत गणितात नापास झाल्याचे सांगितले जात आहे. खरातच्या गुणपत्रिकेनुसार एकूण २५१ गुण आहेत. टक्केवारी सुमारे ३५.८८ टक्के इतकीच आहे.
दहावीत त्याला मराठीमध्ये ३९, इंग्रजीत ३७, गणितात २८, विज्ञानात ६२, समाजशास्त्रात ३८ आणि हिंदीमध्ये ४७ गुण मिळाले होते. सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडीमध्ये राहणारा अशोक खरात वावी येथील माध्यमिक शाळेचा विद्यार्थी होता. १ जून १९६५ त्याची जन्मतारीख असल्याचे दहावीच्या मार्कशीटवर लिहिले आहे. महत्वाचे म्हणजे त्याचे मूळ नाव लक्ष्मण होते नंतर गॅजेटद्वारे त्याने नाव बदलून अशोक कुमार केल्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.