भोंदू अशोक खरातचा सीए माफीचा साक्षीदार बनणार? १०० कोटींच्या हवाला प्रकरणाने खळबळ

Ashok Kharat Case: अशोक खरात हवाला प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. सीए ललित पोफळे माफीचा साक्षीदार बनण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. १०० कोटींच्या व्यवहाराचा तपास वेगात सुरू आहे.
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचं इंटरनॅशनल कनेक्शन; परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर?
Maharashtra Ashok Kharat Case UpdateSaam Tv
Published On

Ashok Kharat Case Update : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आळी आहे. अशोक खरातचा चार्टर्ड अकाउंटंट (CA) ललित पोफळे माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे समजतेय. मिळालेल्या माहितीनुसार, ललित पोफळे हा आता स्वतःला वाचवण्यासाठी खरातच्या विरोधातच पोलीस ठाण्यात तक्रार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

ललित पोफळे याच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. अशोक खरातचे १०० कोटी रुपये दुबईला पाठवल्याचा आणि तब्बल ३०० कोटी रुपयांच्या हवाला व्यवहाराचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या आर्थिक गैरव्यवहारांमुळे पोफळे सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहे.

या प्रकरणात 'शिवनिका ट्रस्ट'च्या संशयास्पद उलाढालीचीही चर्चा होत आहे. २०१८ मध्ये या ट्रस्टची उलाढाल अवघ्या ४ लाख रुपयांच्या घरात होती. अवघ्या सहा वर्षांत या ट्रस्टने कोटींच्या घरात झेप घेतली आहे. एवढ्या कमी कालावधीत झालेली ही मोठी आर्थिक प्रगती संशयास्पद मानली जात आहे. ट्रस्टच्या माध्यमातून झालेल्या या सर्व व्यवहारांचा तपास करण्यासाठी ललित पोफळेची सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचं इंटरनॅशनल कनेक्शन; परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर?
Accident : मोठी बातमी! नागपूरमध्ये काँग्रेस खासदाराच्या कारचा भीषण अपघात, ट्रकने दिली जोरदार धडक

स्वतःवर अटकेची टांगती तलवार असल्याने आणि आरोपी होण्यापासून वाचण्यासाठी ललित पोफळे आता खरातच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल करणार असल्याचे वृत्त आहे. तो पोलिसांना या व्यवहारांची माहिती देऊन 'माफीचा साक्षीदार' बनणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचं इंटरनॅशनल कनेक्शन; परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर?
राजकीय वाद पुन्हा उफाळला; अकोल्यात काँग्रेस-एमआयएम नगरसेवकांमध्ये राडा, चाकू हल्ला अन् हाणामारी

खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारा 'सीए' रडारवर

भोंदू अशोक खरात प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा तपास रडारवर आला असून खरातचे आर्थिक व्यवहार हाताळणाऱ्या एका चार्टर्ड अकाउंटंटसह (सीए) दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. खरातच्या सर्व आर्थिक व्यवहारांची सूत्रे संबंधित सीएच्या हाती होती. त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाची माहिती त्यांच्याकडून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. SIT लवकरच या सीएकडून संपूर्ण आर्थिक तपशील घेण्याची शक्यता आहे. शिवनिका ट्रस्टच्या व्यवहारांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. २०१८ मध्ये अवघी चार लाखांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टने २०२४ पर्यंत कोट्यावधींची झेप घेतल्याने संशय अधिक गडद झाला आहे.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचं इंटरनॅशनल कनेक्शन; परदेशात पैसा पाठवण्यासाठी हवाल्याचा वापर?
२ भावांसोबत नवऱ्याचा बायकोवर बलात्कार, नको तसले व्हिडिओही काढले अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com