अशोक खरातला मिळणार 3 कोटी रुपये, कारागृहातही भोंदूबाबाची कमाई सुरूच; नेमका मॅटर काय?

Ashok Kharat 3 Crore Land Compensation Nashik Ring Road: नाशिकमध्ये सिंहस्थ रिंग रोडसाठी जमिनी संपादन प्रक्रियेत भोंदू बाबा अशोक खरात याच्या कुटुंबाला तब्बल ३ कोटी रुपयांचा मोबदला मिळणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jailed godman Ashok Kharat linked to multi-crore land compensation in Nashik ring road project
Jailed godman Ashok Kharat linked to multi-crore land compensation in Nashik ring road projectsaam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पायाभूत सुविधांच्या कामांना वेग आला आहे. यामध्येच एक धक्कादायक आणि तितकीच चर्चेची बाब समोर आली आहे. लैंगिक शोषण आणि विविध गंभीर गुन्ह्यांखाली सध्या कारागृहात असलेला भोंदू बाबा अशोक खरात याला सिंहस्थ रिंग रोडच्या भूसंपदानात तब्बल 3 कोटी रुपये मिळणार असल्याचे उघड झाले आहे. कारागृहाच्या भिंतीआड राहूनही खरातची कोट्यवधीची कमाई सुरूच असल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंहस्थ रिंग रोडसाठी खरात कुटुंबाच्या वेगवेगळ्या भागातील जमिनी संपादित केल्या जात आहेत. यासाठी त्यांना मोठा आर्थिक मोबदला मिळणार आहे.

गौळाणे परिसर: गौळाणे परिसरातील जमिनीच्या मोबदल्यात अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातला 82 लाख 83 हजार रुपये मिळणार आहेत.

पाथर्डी परिसर: पाथर्डी परिसरातील जमीन खरात याच्या मुलींच्या नावावर आहे. या जमीनिपोटी त्याची मुलगी तृप्तबाला आणि सृष्टी खरात यांना तब्बल 1 कोटी 82 लाख रुपये मिळतील.

Jailed godman Ashok Kharat linked to multi-crore land compensation in Nashik ring road project
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकमधील प्रसिद्ध डॉक्टरचं नाव समोर; गर्भपातासाठी करायचा मदत

निलंबित उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नीचीही भागीदारी

या संपूर्ण जमीन खरेदी प्रकरणाची पाळेमुळे शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. या जमिनीमध्ये भागीदार असलेल्या आणि सध्या निलंबित असलेल्या एका उपजिल्हाधिकाऱ्यांच्या (भांडे पाटील) पत्नीलाही या भूसंपादनातून लाखो रुपये मिळणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या जमीन खरेदी-विक्रीतील संशयास्पद व्यवहारांचीही चर्चा आता रंगू लागली आहे. मुख्य संशयित अशोक खरात हा सध्या कारागृहात असल्याने जमीन खरेदीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत तो उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. नियमांनुसार, तो स्वतः उपस्थित न राहिल्यास या जमिनीचे दर कमी केले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Jailed godman Ashok Kharat linked to multi-crore land compensation in Nashik ring road project
OBC Elgar Melava Indapur | इंदापुरातील ओबीसी एल्गार मेळाव्यातून आमदार Gopichand Padalkar यांचं भाषण

तर दुसरीकडे, पाथर्डी येथील जमिनीचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी अशोक खरात याच्या दोन्ही मुलींना (तृप्ताबाला आणि सृष्टी) प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com