Ashadhi Wari 2022 : हरिभक्तीच्या खेळात वैष्णव दंगला, अकलूजमध्ये तुकोबांच्या पालखीचे तिसरे रिंगण

अकलूजमध्ये दुसऱ्या गोल रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
Ashadhi Wari 2022 News updates in Marathi, Pandharpur Wari news
Ashadhi Wari 2022 News updates in Marathi, Pandharpur Wari news Saam Tv
Published On

अकलूज: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची (Tukaram Maharaj) पालखी मंगळवारी अकलूजमध्ये दाखल झाली. अकलूजमध्ये पालखी (Ashadhi Wari) दाखल होताच, पालखीचे तिसरे रिंगण पार पडले. रिंगण सोहळ्याचे पूजन मोहिते-पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी अकलूजमध्ये हरिभक्तांनी विविध खेळात दंग झालेल्या वैष्णवांमुळे रिंगणात रंग भरला. वारकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. जवळपास दोन वर्षानंतर हा रिंगण सोहळा पार पडला. (Ashadhi Wari 2022 Latest Marathi News)

यावेळी अश्वाचे पूजन मोहिते-पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावर्षीचे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले रिंगण आहे, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचे तिसरे रिंगण आहे. तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) यांच्या पादुकांचे सराटी येथे निरेत स्नान (Nira River) झाल्यानंतर पालखी अकलूज नगरीत पोहचली. अकलूजमध्ये आज ११ वाजता भव्य दिव्य रिंगण सोहळा संपन्न झाला. वारकरी आणि अकलूजकर रिंगण सोहळ्याचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानावर जमले होते.

Ashadhi Wari 2022 News updates in Marathi, Pandharpur Wari news
Maharashtra Rain: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार; पंचगंगेची पाणी पातळी ८ फुटांनी वाढली

तुकाराम महाराजांच्या पालखीने(Ashadhi Wari) अकलूजमध्ये प्रवेश केल्यानंतर वाजत गाजत या पालखीचे स्वागत करण्यात आले. अकलूजच्या मैदानात रिंगण सोहळा पार पडला. यावेळी शेकडो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली होती. आजचे तिसरे रिंगण अकलूज मधील माने विद्यालयात झाले.(Pandharpur wari Latest Marathi News)

Ashadhi Wari 2022 News updates in Marathi, Pandharpur Wari news
Shivsena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नवी खेळी; पुण्यातही शिंदे गटाची ताकद वाढणार?

संत तुकोबारायांची पालखी देहू ते पंढरपूर प्रवास करताना महत्वाचा विधी म्हणजे निरा स्नान असते. पुणे जिल्ह्यातून सोलापूरात प्रवेश करताना मध्ये निरा नदी आहे. याच निरा नदीत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सकाळी स्नान घातले जाते. पादुकांची आरती होते, आणि पुढचा प्रवास सुरु होतो.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतरच पहिले गोल रिंगण अकलूज नगरीत पार पडले. तुकोबारायांच्या अश्वांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com