Maharashtra Rain: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार; पंचगंगेची पाणी पातळी ८ फुटांनी वाढली

'एनडीआरएफ'च्या पथकांना सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain UpdateSaam Tv
Published On

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Rain) जोर धरला आहे. मुंबई, कोकणासह राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. कोल्हापुरातही संततधार पाऊस सुरू झाला. काल रात्रीपासून पावसाने जोर धरला असून, धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस (Rain) झाला. पंचगंगा पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या १२ तासाच पंचगंगा पाणी पातळीत ८ फुटांनी वाढ झाली आहे.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीवरील १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मागिल १२ तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी ८ फुटांनी वाढली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी पात्रात न जाण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन केले आहे.

Maharashtra Rain Update
Mumbai Rain Today : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; विक्रोळीत घरावर दरड कोसळली

हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेता. पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात साधला आहे. तसेच एन डी आर एफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

Maharashtra Rain Update
पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे (Rain) काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे.

याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com