Mumbai Rain Today : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; विक्रोळीत घरावर दरड कोसळली

आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे.
Mumbai Rain Today
Mumbai Rain Today Saam Tv
Published On

मुंबई : आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची (Rain) बॅटिंग सुरू आहे. मुंबई उपनगरातील बोरीवली, कांदिवली, दहिसर अंधेरी परिसरात काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाने (IMD) सखल भागात पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे. अशातच विक्रोळीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विक्रोळी परिसरात एका घरावर दरड कोसळली असल्याची माहिती आहे. (Mumbai Rain Latest News)

Mumbai Rain Today
पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

माहितीनुसार, विक्रोळीतील पंचशील नगर साई प्रेरणा सोसायटी खंडोबा टेकडी परिसरात ही घटना आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कुणीही जखमीही झालेलं नाही. मुंबईत सतत सुरू असलेल्या पावसाने मुंबईच्या तलावांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्याची माहिती आहे.

मुंबईच्या तलावांतील पाणीसाठा 4.80 टक्क्यांनी वाढला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या 14.80 टक्के पाणीसाठा आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पुढील दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. दरम्यान, पाणीसाठ्यात वाढ झाली असली तरी, तूर्तास लागु असलेली 10 पाणीकपात मागे घेण्याचा अद्याप विचार नाही. (Mumbai Rain Today)

Mumbai Rain Today
Maharashtra Rain Update: राज्यातील १४ जिल्ह्यांत अलर्ट; NDRF ला सतर्कतेचा इशारा

दुसरीकडे मुसळधार पावसाचा फटका मुंबई लोकलला सुद्धा बसला आहे. पावसामुळे दृश्यमानता कमी झाली. त्यामुळे लोकल चालवताना मोटरमनला अडचणी आल्या आणि लोकलचा वेग मंदावला. परिणामी लोकल वेळापत्रक विस्कळीत झाले होते. तीच परिस्थिती मंगळवारी मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याण, हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर आहे.

पावसामुळे मध्य रेल्वेवरील लोकल पंधरा मिनिटे उशिरा धावत आहेत. हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलही दहा मिनिटे विलंबाने होत आहेत. त्यामुळे लोकल गाड्यांना गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला, विद्याविहार, सायन यासह काही स्थानकांच्या बाहेर, तर रुळांच्या आजूबाजूलाही पाणी साचले आहे. पाऊस दिवसभर सुरु राहिल्यास लोकल वेळापत्रक आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com