Shivsena: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नवी खेळी; पुण्यातही शिंदे गटाची ताकद वाढणार?

पुण्यातही शिंदे गटाला बळकटी देण्याचं काम एकनाथ शिंदे करत असल्याची माहिती आहे.
Maharashtra New CM Eknath Shinde News, Pune News, shivsena News
Maharashtra New CM Eknath Shinde News, Pune News, shivsena NewsSaam TV

मुंबई : शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. भाजपच्या पाठिंब्याने शिंदेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर सोमवारी विधानसभेच्या अधिवेशनात त्यांनी बहुमतही सिद्ध केलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नजर शिवसेनेच्या नगरसेवकांवर आहे. मुंबईसह पुण्यात शिंदे गटाला बळकटी मिळावी म्हणून शिंदेंनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (CM Eknath Shinde Latest News)

Maharashtra New CM Eknath Shinde News, Pune News, shivsena News
छगन भुजबळ वेश बदलून गेले अन् तुरुंगात अडकले मागून मी पण गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला जुना किस्सा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडानंतर भाजपशी हातमिळवणी करत राज्यात भाजप- शिवसेना शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, शिंदे यांच्या बंडानंतर उद्बवलेल्या राजकीय स्थितीत त्यांच्या पाठिशी पुण्यातील सेनेची ताकद किती होती हे स्पष्ट होऊ शकले नव्हते.

त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा आता पुण्याकडे वळवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांना गळाला लावून, पुण्यातही शिंदे गटाला बळकटी देण्याचं काम एकनाथ शिंदे करत असल्याची माहिती आहे. (CM Eknath Shinde News)

Maharashtra New CM Eknath Shinde News, Pune News, shivsena News
माझी टिंगलटवाळी करणाऱ्यांचा मी बदला घेणार; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले वाचा...

दुसरीकडे शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर पुण्यात अद्याप शिंदे गटाला उघड उघड कोणीही पाठींबा दिलेला नव्हता. मात्र, आता एकनाथ शिंदेंना उघड पाठींबा मिळत आहेत. महापालिका निवडणूकांच्या तोंडावर शहरात अद्याप सरळ सरळ कोणी शिंदे गटला पाठींबा दिलेला नसला तरी भानगिरे यांच्या माध्यमातून शिंदे गटाची ताकद शहरात वाढविली जाणार असल्याची चर्चा आहे.

भानगिरे यांचा जनसंपर्क या भागात दांडगा असल्याने त्याचा फायदा शिंदे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघ, हडपसर तसेच पुरंदर मतदारसंघासाठी होणार आहे. भानगिरे यांनी त्याच्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे या नावाने उद्यान उभारले आहे.

राज्यातील राजकीय घडामोडीच्या काळात ते शिंदे यांच्या संपर्कात होते. त्यामुळे मुख्यमंत्र्याबरोबर असलेल्या या जुन्या ऋणानुबंधामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी मिळू शकतो अशी चर्चा आता शहरात सुरू झाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com