Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: अमृता फडणवीस-प्रियंका चतुर्वेदींमध्ये जुंपली; सोशल मीडियावरच काढली 'औकात', नेमकं काय झालं?

Political News : अमृता फडणवीस-प्रियंका चतुर्वेदींमध्ये जोरदार शाब्दिक चकमक
Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: अमृता फडणवीस-प्रियंका चतुर्वेदींमध्ये जुंपली; सोशल मीडियावरच काढली 'औकात', नेमकं काय झालं?

Amruta Fadanvis News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका महिलेने धमकावून १ कोटी रुपयांची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अमृता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. आपल्या ट्विटरवरून प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. तर अमृता फडणवीस यांनी देखील ट्विटरवरूनत प्रत्युत्तर देत औकातीची भाषा केली आहे. (Latest Marathi News)

Amruta Fadnavis vs Priyanka Chaturvedi: अमृता फडणवीस-प्रियंका चतुर्वेदींमध्ये जुंपली; सोशल मीडियावरच काढली 'औकात', नेमकं काय झालं?
CM Eknath Shinde : इन्फल्युएंझा आजाराच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा

काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी ?

प्रियंका चतुर्वेदी ट्विट करत म्हणल्या की, एका गुंडाच्या मुलीला उपमुख्यमंत्र्यांच्या घरात घुसण्यास मिळतं आणि 5 वर्ष त्यांच्या पत्नीशी मैत्री करते. त्यांच्या पत्नीला दागिने, कपडे देते. त्यांच्या कारमधून फिरते. ही डिझायनर मैत्रीण त्यांना आपण बुकींची माहिती देत, त्यांच्यावर धाड टाकत आणि तडजोड करत त्यातून पैसे कमावू शकतो असं सुचवते. पण त्यानंतरही त्यांची मैत्री कायम राहिते असे चर्तुर्वेदी सुरुवातीला ट्विटमध्ये मांडले.

दुसऱ्या ट्विटमध्ये प्रियंका म्हणाल्या की, डिझायनर मैत्रिणी तिला बुकींची तक्रार करून, छापा टाकत त्यांच्याकडून पैसे कमवू अशी सेटलमेंट करते. तरीही त्यांची मैत्री कायम आहे. आता व्हिडिओ आणि ब्लॅकमेलचे आरोप होत आहेत. महाराष्ट्रात काय चालले आहे असा सवाल चर्तुर्वेदी यांनी यावेळी उपस्थित केला.

पुढे त्या म्हणाल्या की "आता उपमुख्यमंत्री हा राजकीय कट असल्याचं म्हणतात. राज्याचे पोलीस नक्की कोणाला रिपोर्ट करतात? देवेंद्र फडणवीसांना,  राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद फडणवीस, तक्रारदार कोण आहे? अमृता फडणवीस....मग याप्रकरणी स्वतंत्र चौकशी नको का? असे देखील चर्तुर्वेदी आपल्या ट्विटमध्ये म्हणल्या आहेत.

अमृता फडणवीसांनी काढली 'औकात'

प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटला अमृता फडणवीस यांनी उत्तर देत म्हटलं की "मॅडम चतूर, तुम्ही याआधी माझ्यावर अ‍ॅक्सिस बँकेला फायदा मिळवून दिल्याचे खोटे आरोप केले होते. आणि आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात? अर्थात - तुमचा विश्वास संपादन केल्यावर, जर कोणी-पैसे देऊन केसेस बंद करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधला असता तर तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या मालकाद्वारे मदत केली असती तीच तुमची औकात आहे.

डिझायनर महिलेला अटक

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका महिलेने धमकावून १ कोटी रुपयांची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अमृता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी यांना ताब्यात घेतलं. उल्हासनगरमधल्या राहत्या घरातून अनिक्षाला ताब्यात घेतलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com