जिलेबी कितीही आडवळणी असो....; अमृता फडणवीसांच्या उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त गोड शुभेच्छा

राजकारणाच्या पलीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजचा दिवस विशेष आहे.
Amruta Fadnavis and Devendra fadnavis
Amruta Fadnavis and Devendra fadnavis saam tv
Published On

मुंबई : राजकारणाच्या पलीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासाठी आजचा दिवस विशेष आहे. कारण आज त्यांचा वाढदिवस आहे. राज्यभरातून राजकीय कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त फडणवीस (Birthday Wishes) यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही (Amruta Fadnavis) वाढदिवसानिमित्त गोड शुभेच्छा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते, अशा आशयाचं ट्विट अमृता यांनी केलं आहे.

Amruta Fadnavis and Devendra fadnavis
उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण....; शिवसेना खासदार स्पष्टच बोलले

फडणवीसांना शुभेच्छा देताना अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, जिलेबी कितीही आडवळणी असो,तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी,अडथळ्यांची शर्यत पार करीत त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Amruta Fadnavis and Devendra fadnavis
राष्ट्रपतींच्या शपथविधीवेळी स्नेहभोजन शाकाहारी ठेवा; केंद्राला थेट पुण्यातून मागणी

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज देशाचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. दिल्लीतील हॉटेल अशोकामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून देशातील सर्वच राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com